भेसळयुक्त खाद्यपदार्थांची बिनबोभाट विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Sale of adulterated food

रिसोड शहर आणि परिसरात दुग्धजन्य पदार्थांसह किराणामाला मध्येही मोठी भेसळ होत असून, भेसळीने अक्षरशः कळस गाठला आहे. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात पेढा येतो तरी कुठून असा प्रश्न स्वीट मार्टला भेट दिल्यानंतर पडतो होत आहे. पेढा व दुग्धजन्य पदार्थाची विक्री करणारे हे परप्रांतीय आहेत.

भेसळयुक्त खाद्यपदार्थांची बिनबोभाट विक्री

रिसोड (जि.वाशीम) ः रिसोड शहर आणि परिसरात दुग्धजन्य पदार्थांसह किराणामाला मध्येही मोठी भेसळ होत असून, भेसळीने अक्षरशः कळस गाठला आहे. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात पेढा येतो तरी कुठून असा प्रश्न स्वीट मार्टला भेट दिल्यानंतर पडतो होत आहे. पेढा व दुग्धजन्य पदार्थाची विक्री करणारे हे परप्रांतीय आहेत.

त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासनाचा परवाना आहे किंवा नाही हा संशोधनाचा विषय आहे. या भेसळीमुळे मात्र नागरिकांना मोठ्या प्रमाणात आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. त्याच प्रमाणे याठिकाणी सोशल डिस्टंसिंग व विक्री करणारे मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे.


दिवाळी सण तीन-चार दिवसावर येऊन ठेपला आहे. दिवाळी सणाला तेल तूप व मिठाई याचा वापर प्रत्येक घरी मोठ्या प्रमाणात केला जातो. मिठाई व फराळाचे साहित्य ऑर्डर करून बाहेरून बोलावण्याची जणू एक फॅशन झाली आहे. बाहेरून खरेदी केलेल्या या पदार्थाची केवळ चमकधमक पाहिल्या जाते शुद्धता मात्र कुठेही पाहिल्या जात नाही.

दिवाळीच्या सणामध्ये मिठाईसह सह पेढ्याची मोठ्या प्रमाणात विक्री केले जाते; परंतु यापुढे यासाठी लागणारा खवा येतो कुठून याचा कोणालाही थांगपत्ता नाही. शहरातील कोणत्याही मिठाईच्या दुकानासमोर दुधापासून तयार पदार्थ केलेले दिसत नाहीत, मग एवढ्या प्रमाणात दुकानांमध्ये पेढा कोठून येतो?

शहरात आठवड्यातून एक किंवा दोन वेळेस बाहेरगावावरून पेढा येतो. मागे तर चक्क स्कूल बस मधून शहरात पेढा येत असल्याची जोरदार चर्चा होती. शहरात परंपरागत पणे मिठाईचा व्यवसाय करणारी आणि खऱ्याखुऱ्या मिठाईसाठी आपला नावलौकिक टिकून असलेली केवळ दोन-तीन दुकाने आहेत; मात्र त्यापेक्षा जास्त भेसळीचा बाजार मांडून बसलेली दुकाने काचांमध्ये पांढरीशुभ्र व चमचमीत मिठाई मांडून बसली आहे.

भेसळीची पण जादा दराने विक्री करत असून, चमक धमकमुळे ग्राहक त्याला बळी पडत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभाग मात्र याबाबत अनभिज्ञ आहे. दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर मिठाईच्या या दुकानांमध्ये गर्दी वाढली असून याठिकाणी सोशल डिस्टंसिंग चा फज्जा उडालेला आहे त्याचप्रमाणे त्याच प्रमाणे विक्रेते मास्कचा वापर करत नसल्याचे दिसून येत आहे.


रस्त्यावरील धुळ खाद्यपदार्थात
दिवाळी निमित्त फरसाण विकणार्या दुकानदारांनी रस्त्यावर आपली दुकाने थाटली आहेत. यामधे फराळाच्या पदार्थांचा समावेश आहे. मात्र रस्त्यावरील संपूर्ण धुळ खाद्यपदार्थात मिसळून हे पदार्थ खाण्यास अयोग्य ठरत असताना अन्न व औषध प्रशासन विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Web Title: Akola News Sale Adulterated Food

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top