
राज्य शासनाने ता. ११ डिसेंबर २०२० रोजी नवीन आकृतीबंधानुसार ठोक मानधनावर चतुर्थ श्रेणी कर्मचारी विशेषत: शिपाई, नाईक, पहारेकरी, आदींची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. हा शाळा संहिता १९८१ मधील तरतुदीच्या विसंगत आहे.
अकोला : राज्य शासनाने ता. ११ डिसेंबर २०२० रोजी नवीन आकृतीबंधानुसार ठोक मानधनावर चतुर्थ श्रेणी कर्मचारी विशेषत: शिपाई, नाईक, पहारेकरी, आदींची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. हा शाळा संहिता १९८१ मधील तरतुदीच्या विसंगत आहे.
बेरोजगार तरुणावर अन्याय करणारा शासन निर्णय रद्द करण्यासाठी शिक्षण महामंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री विजय नवल पाटील यांच्या नेतृत्वात ता. १८ डिसेंबर रोजी संस्था संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर संघटनांनी संयुक्तपणे शाळा बंद आंदोलन पुकारले आहे.
महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षणाचे कंत्राटीकरण सुरू करण्याचे व चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिपाई संवर्ग यांचे जीवन उध्वस्त करण्याचे काम करू नये. याबाबत राज्यातील मुख्याध्यापक महासंघ, शिक्षक संघटना, पालक व विद्यार्थी संघ, शिक्षणतज्ञ, शिक्षण संस्था संघ व महामंडळ यांनी या निर्णया विरोधात आक्षेप घेतला आहे.
शिक्षण संस्थांच्या बैठकीत निर्णय
हा आकृतीबंध मागे घेण्यासाठी ता. १८ डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन करण्याचा, शासन निर्णयाची होळी करण्याचा व जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा निर्णय शिक्षण क्षेत्रातील संस्था संचालक मंडळ, शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघ, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जागृती विद्यालय अकोला येथे झालेल्या बैठकीत घेतला आहे.
यांची होती उपस्थिती
या बैठकीला अध्यक्षस्थानी संस्था संचालक मंडळाचे अध्यक्ष विजय कौसल, तर सचिव अॅड.विलास वखरे, सचिन जोशी, आनंद साधू, शत्रुघ्न बिरकड, डॉ.अविनाश बोर्डे, बळीराम झामरे, विलास अत्रे, डॉ.विजय ताले, प्रदीप थोरात, प्रशांत मानकर, श्रीराम अतकर, संतोष पेठे, गजानन चौधरी, माधव मुन्शी, सैय्यद इसहाक राही, डॉ.साबीर कमाल, मोहम्मद जाकीर, विनायक देशमुख, सौ.एम.डी.तळोकार, माधुरी ठाकुर, मेघा देशपांडे, सुनिता गोसावी, संजय साबळे, सुभाष वाघ, सतीश फडणीस, एम.पी.विखे, अरुण दातकर, आर.एन.ठाकरे, पंडित भिमराव देशमुख, रामेश्वर धर्मे, निरंजन बंड, हरीश शर्मा, इम्तियाज अहमद खान, दीपक बिरकड, उन्मेश रिंगणे, दि.व.वाहूरवाघ, अकबर अली खान, जयंत पाटील, उल्हास कुळकणी, अनिल मसने, राजाभाऊ इंगळे, मो.आकीफ शेख, राजेंद्र देखमुख आदींसह विविध
संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
(संपादन - विवेक मेतकर)