शेगावच्या अर्थचक्राला ब्रेक, विदर्भाच्या पंढरीत कामगारांची उपासमार, व्यवसायिकही हतबल

संजय सोनोने
Saturday, 8 August 2020

कोरोनाचा विषाणुने संपूर्ण वेठीस आले आहे. या विषाणूने नुसते आरोग्यावरच नाही तर सर्वच क्षेत्रावर विपरीत परिणाम केला आहे. याचा फटका विदर्भाची पंढरी म्हणुन ओळख असलेल्या संतनगरी शेगावलाही बसला आहे.

शेगाव (जि.बुलडाणा)  ः कोरोनाचा विषाणुने संपूर्ण वेठीस आले आहे. या विषाणूने नुसते आरोग्यावरच नाही तर सर्वच क्षेत्रावर विपरीत परिणाम केला आहे. याचा फटका विदर्भाची पंढरी म्हणुन ओळख असलेल्या संतनगरी शेगावलाही बसला आहे.

मागील चार ते पाच महिन्यापासून सतत लाॅकडाउनमुळे शेगावच्या अर्थचक्राला ब्रेक लागला असून, यामुळे व्यावसायिक हतबल झाले असून, कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

शेगाव शहरात पहिला रुग्ण एप्रिल महिन्यांत सापडला होता. तेव्हा पासून आरोग्य यंत्रणा कोरोना सोबत स्वतः च्या जिवाची पर्वा न करता युद्ध करीत आहे. कोरोना विषाणुमुळे अनेकांचे रोजगार गेले, व्यवसाय संपले , बेरोजगारी आल्याने अर्थचक्र स्टॉप झाले आहे.

शेगावचे नाव श्री संत गजानन महाराजांमुळे जगात घेतल्या जाते. जगातील अनेक देशात श्रींचे भाविक आहेत. श्रींच्या दर्शनासाठी दररोज हजारो भविकाची शेगावात रेलचेल असायची. भाविक रेल्वेने, एसटी बसने, ट्राव्हल्सने शहरात दाखल व्हायचे. मात्र, २४ मार्च पासून जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे रेलचेल थांबली.

शहरात १२५ निवासी हॉटेल आणि लॉज आहेत. लॉकडाउनमुळे मार्च महिन्यापासून लॉक असलेली हॉटेल अजूनही लॉकच आहेत. त्यामुळे या हाॅटलवर काम करणारे कामगार बेरोजगार झाले आहेत.

रिक्षा चालकांची स्वप्नही झाले लाॅक
दररोज पहाटे ४ वाजता विदर्भ एक्सप्रेस आल्यावर रेल्वे स्टेशनवर चला भाऊ, चला ताई, मंदिर ,बस स्टैंड, कॉलेज असे ऑटो रिक्षावाल्यांचे आवाज, कर्ण कर्कश हॉर्न, दिवसभर यायचे. ते कोरोनामुळे कायमचे बंद झाले आहेत. त्यासोबत शहरातील ७०० रिक्षा चालकांचे रिक्षा चालवून मुलांचे शिक्षण, आणि चरितार्थ चालविण्याचे स्वप्न पण अजूनही लॉकच आहे.

Video : अरे हे काय ! बहिणीने भावाला राखी बांधायच्या ऐवजी; बहिणीनेच भावाचा व्यवसाय केला उध्दवस्त

अनेकांनी सुरू केले शेतकाम
शेगाव तालुक्यातील ३०० ॲपे, मिनीडोर ,प्रवासी वाहतूक करुन आडवळणाच्या खेड्यास शहराला जोडतात. रात्री बेरात्री गावातील रुग्ण शहरातील डॉक्टरजवळ आणून रुग्णाचे प्राण वाचवण्यात मोलाची कामगिरी बजावणारे आता स्वतः बेरोजगार झाले आहेत. नोकरी नसल्याने प्रवासी वाहतूक करणारे आता परत बेरोजगार झाल्याने या व्यावसायावर अवलंबून असणाऱ्या काहिनी आता शेतात येईल ते काम करने सुरु केले आहे.

बांधकाम व्यावसायही ठप्प
लॉकडाउनमुळे बांधकाम व्यवसाय बंद झाल्याने मिस्त्री, बांधकाम मजूर , खासगी इलेक्ट्रिशियन ,प्लम्बर ,हार्डवेयर्स वर काम करणारे हमाल यांचीसुद्धा कुटुंब चालविणसाठी संघर्ष सुरु आहे. कोरोनाचे युद्ध सुरु आहे. त्या युद्धात प्रत्येक व्यक्ति आपापल्या परिने काम करीत आहे. कोरोना सोबतचे युद्ध तर जिंकायचेच आहे मात्र, कोरोनामुळे बेरोजगारीने आर्थिक बाजूने कोलमडलेल्या प्रत्येक व्यक्तिने एकमेकांना धीर देऊन नव्या दमाने उभे राहण्यासाठी मदत करणेही मोठी जबाबदरी प्रत्येक व्यक्ती वर आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News Shegaon economic cycle breaks, Vidarbhas Pandharti workers starve, businessmen also helpless