esakal | पालकमंत्र्यांच्या घरासमोर वरली दुकान थाटू
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: A shop will be set up in front of the Guardian Ministers house

जिल्ह्यातील बेकायदेशीर व्यवसायावर कोणीच बोलायला तयार नाही? शासन प्रशासनाच्या कृपाशिर्वादातूनच बुलडाणा जिल्ह्यात बेकायदेशीर व्यवसायाला ऊत आला आहे. शेतकरी,कामगार आर्थिक विवंचनेत असताना बेकायदेशीर व्यवसायाला ऊत आल्यामुळे सर्वसामान्यांवर उपासमारी व आत्महत्येची वेळ जिल्ह्यात आलेली आहे.

पालकमंत्र्यांच्या घरासमोर वरली दुकान थाटू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

बुलडाणा : जिल्ह्यातील बेकायदेशीर व्यवसायावर कोणीच बोलायला तयार नाही? शासन प्रशासनाच्या कृपाशिर्वादातूनच बुलडाणा जिल्ह्यात बेकायदेशीर व्यवसायाला ऊत आला आहे. शेतकरी,कामगार आर्थिक विवंचनेत असताना बेकायदेशीर व्यवसायाला ऊत आल्यामुळे सर्वसामान्यांवर उपासमारी व आत्महत्येची वेळ जिल्ह्यात आलेली आहे.

त्यामुळे त्वरित जिल्ह्यातील बेकायदेशीर व्यवसाय बंद न झाल्यास पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या घरासमोर वरलीचे दुकान सुरू करणार असल्याचे आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. सतीशचंद्र रोठे यांनी जाहीर केले आहे.


मागील पंचवीस वर्षांपासून जिल्ह्यातील व शहरातील बेकायदेशीर व्यवसाय बंद ठेवण्यासाठी आझाद हिंद संघटना सर्वस्व पणाला लावत रस्त्यावर उतरली आहे. बेकायदेशीर व्यवसायांना विरोधात शासन प्रशासनासोबत लढा देत असताना असंख्य गुन्हे बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्यासाठी आम्ही स्वतःवर लावून घेतले. अनेक वेळा तुरुंगवासही भोगला.

तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक  संजय कुमार वर्मा यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्यासाठी कारागृहात राहून आणि रस्त्यावर अशा दोन्ही लढाया आझाद हिंद संघटनेने अविरत नऊ महिने आंदोलनात्मक लढा दिला. त्यानंतरही सातत्याने आंदोलनात्मक पवित्रा घेत जिल्ह्यात बेकायदेशीर व्यवसाय कीडच लागणार नाही यासाठी आझाद हिंद संघटना लढत आहे. परंतु, सद्यःस्थितीत बेकायदेशीर व्यवसायाचा सुळसुळाट शहरासह जिल्ह्यात दिसून येत आहे.

पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी जिल्ह्यातील बेकायदेशीर व्यवसाय आणि गुटखा विक्री बंद ठेवण्याचे जाहीर आवाहन केले होते. बुलडाणा जिल्हा पॅटर्न महाराष्ट्रात राबविण्याचे आश्वासनही त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिले होते. नेमके बेकायदेशीर व्यवसाय बंदचे की बेकायदेशीर व्यवसाय सुरू करण्याचे पॅटर्न महाराष्ट्रात राबविणार आहेत...? हे प्रथम त्यांनी जाहीर करावे व जिल्ह्यातील अवैद्य धंदे त्वरित बंद करावे.

अन्यथा आपल्या घरासमोर वरलीचे दुकान लावणार असल्याचे एक आंदोलन आझाद हिंद शेतकरी संघटना राबविणार आहे. बुलडाणा जिल्ह्याची, शहराची संस्कृती,वारसा अबाधित ठेवण्यासाठी बेकायदेशीर व्यवसाय मुक्त जिल्हा, शहर ठेवण्यासाठी आझाद हिंद शेतकरी संघटना आंदोलनात्मक पवित्रा घेत रस्त्यावर उतरणार आहेत. त्वरित सर्व बेकायदेशीर व्यवसाय बंद न झाल्यास पालकमंत्र्यांच्या घरासमोर वरलीचे दुकान लावणार असल्याचे एका प्रसिद्धी पत्रकातून आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. सतीशचंद्र रोठे यांनी जाहीर केले आहे.

शहरासह जिल्ह्यात वरली हब
जिल्ह्यातील ग्रामीण भागात तर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर व्यवसायांनी डोके वर काढले आहे शिवाय, शहरी भागात चक्क पोलिस स्टेशन आणि मोठ्या चौकात वरलीसह बेकायदेशीर व्यवसायाचे हब तयार झाले आहे. एकीकडे सत्तेत असलेली आघाडी तर दुसरीकडे विरोधी पक्षातील नेत्यांचे व्यवसाय अशात बोलणार कोण असा सवाल आता निर्माण झाला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image