अजब कारभार, उपकार्यकरी अभियंता पदाचा प्रभार कुणाकडेच नाही

गजानन काळुसे
Wednesday, 18 November 2020

सिंदखेड राजा येथील महाराष्ट्र राज्य विज वितरण मर्यादित विभागा अंतर्गत उपकार्यकरी अभियंता सहाय्यक, अप्पर लिपिक, सहाय्यक लेखापाल, सहाय्यक अभियंता, लाईनमन पदे रिक्त असल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.

सिंदखेड राजा (जि.बुलडाणा) :सिंदखेड राजा येथील महाराष्ट्र राज्य विज वितरण मर्यादित विभागा अंतर्गत उपकार्यकरी अभियंता सहाय्यक, अप्पर लिपिक, सहाय्यक लेखापाल, सहाय्यक अभियंता, लाईनमन पदे रिक्त असल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.

सिंदखेड राजा महावितरण राम भरोसे असल्यामुळे उपकार्यकरी अभियंता हे मुख्य पदच रिक्त असल्यामुळे व कागदोपत्री महावितरण'चा कारभार कोणाकडेच नसल्यामुळे अजब कारभार पाहायला मिळत आहे

त्यामुळे सेवांचा बोजवारा उडाला आहे. वीज वितरण कंपनीकडून वीज ग्राहकांच्या समस्या वेळेवर सुटत नाही. विशेषतः तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाशी च्या समस्या वाढल्या आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वीज वितरण कंपनी बदल असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे महावितरण विभागाला रिक्त पदाच्या शॉक मधून बाहेर काढणे गरजेचे आहे. अन्यात ग्राहकांच्या समस्यांरुपी फेजला ग्रहण लागण्याची शक्यता आहे. 

महावितरण कंपनी मध्ये कमी मनुष्यबळ असल्यामुळे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची धावपळ होते.वेळेवर ग्राहकांना सेवा देण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागतो,त्यामुळे नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. महावितरण उपकार्यकरी अभियंता हे पद मागील ४ ते ५ महिन्यापासून रिक्त आहे.

कार्यालयामधील सहाय्यक अभियंता १ पद ,अप्पर लिपिक २ पद , सहाय्यक लेखापाल १ पद , हे पद रिक्त आहेत

 त्यांचप्रमाणे ग्रामीण भागातील विद्युत लाईन सुरळीत राहण्यासाठी महत्वाचा दुवा म्हणजे लाईनमन तालुक्यातील २५ लाईनमनचे पद रिक्त आहे.त्यामुळे ग्रामीण भागात काम करतांना कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते.

तालुक्यातील चार उपकेंद्र असून त्यामध्ये किनगांव राजा ऊपकेंद्रा अंतर्गत लाईनमन मंजूर एकूण ११ पदे आहेत.त्यापैकी कार्यरत ६ पदे आहेत, तर ५ पदे  रिक्त आहेत. दुसरबीड उपकेंद्रा अंतर्गत लाईनमन चे मंजूर एकूण १४ पदे आहेत.

त्यापैकी कार्यरत लाईनमन ४ पदे , रिक्त पदे १० आहेत. साखरखेर्डा उपकेंद्र अंतर्गत लाइन म्हणजे एकूण मंजूर पदे १२ आहेत, त्यापैकी कार्यरत पदे १० आहेत तर २ पदे रिक्त आहे. सिंदखेड राजा उपकेंद्र अंतर्गत लाईन म्हणजे एकूण मंजूर पदे १४ आहेत त्यापैकी कार्यालयात ६  रिक्त पदे ८ आहेत त्यामुळे मोठ्या संख्येने रिक्त पदे असल्यामुळे महावितरण सेवेचा बोजवारा उडालेला आहे.

 महाविरणमध्ये खाजगी कर्मचारी सांभाळतात सबस्टेशन स्टेशनचा कारभार 
सिंदखेड राजा तालुक्यांमध्ये ४ उपकेंद्र असून त्याअंतर्गत १० सबस्टेशन आहेत त्यामध्ये दुसरबीड मध्ये २ सबस्टेशन असून त्यामध्ये ४ पदे मंजूर आहेत त्यापैकी २ कर्मचारी कार्यरत आहे तर २ पदे रिक्त आहेत. किनगांव राजा उपकेंद्र अंतर्गत २ सब स्टेशन आहेत,त्यामध्ये २ पदे मंजुर आहेत.परंतु दोन्ही पदे रिक्त असल्यामुळे खाजगी व्यक्ती सब स्टेशन चा कार्यभार सांभाळत आहे.साखरखेर्डा उपकेंद्र अंतर्गत ३ सब स्टेशन असून त्यामध्ये पदे रिक्त आहे.

सिंदखेड राजा येथे ३ सब स्टेशन त्यामध्ये ३ कर्मचारी कार्यरत आहे.त्यामुळे सिंदखेड राजा तालुक्यातील महावितरण च्या सब स्टेशनची जबाबदारी तालुक्यातील खाजगी कर्मचारी सांभाळत असल्याचे दिसून येते.

चार महिन्यापासून उपकार्यकारी अभियंता पद रिक्त
सिंदखेड राजा उपकार्यकरी अभियंता हे पद मागील चार महिन्यापासून रिक्त आहे. विलास पापुलवार हे निलंबित झाल्यानंतर पासून पद रिक्त आहे. सिंदखेड राजा कार्यालयातील सहाय्यक अभियंता प्रशांत पडघान हे सद्या पदभार पहात आहे,परंतु त्यांच्याकडे कागदोपत्री कोणताही पदभार देण्यात आलेला नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांना  व ग्राहकांना रिक्त पदामुळे विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे,त्यामुळे कायम स्वरूप उपकार्यकारी अभियंता देण्यात यावा अशी मागणी होत आहे.

उपकार्यकारी अभियंता खान यांची नियुक्ती सिंदखेड राजा  याठिकाणी झालेली आहे परंतु अद्यापही ते रुजू झालेले नाहीत, खान यांना सिंदखेड राजा परिसरामध्ये रुजू व्हायचे नसल्यामुळे बदलीच्या प्रक्रियेमध्ये आहे. उपकार्यकारी अभियंता खान हे दोन तीन दिवसांत रुजू होतील.
-नितीन माळोदे, कार्यकारी अभियंता महावितरण बुलढाणा

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Sindkhed Raja Mahavitaran served overnight due to vacancy