
सिंदखेड राजा तालुक्यातील समृद्धी महामार्ग जात असल्यामुळे त्यांचे समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे .त्यासाठी तालुक्यातील तढेगाव येथे समृद्धी महामार्गाचा प्रशस्त असा मोठा कॅम्प आहे.
सिंदखेड राजा (जि.बुलडाणा) : सिंदखेड राजा तालुक्यातील समृद्धी महामार्ग जात असल्यामुळे त्यांचे समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे .त्यासाठी तालुक्यातील तढेगाव येथे समृद्धी महामार्गाचा प्रशस्त असा मोठा कॅम्प आहे.
याच ठिकाणी समृद्धी महामार्ग साठी लागणाऱ्या गिट्टी तयार केली जाते. त्याचप्रमाणे समृद्धी महामार्ग साठी लागणारे कच्चामाल याच ठिकाणी बनविला जातो त्यामुळे या ठिकाणावरून किनगाव राजा, पिंपळगाव लेंडी ,सावखेड तेजन फाट्यापर्यंत जवळ समृद्धीच्या महामार्गाचे काम सुरू आहे.
त्यामुळे टिप्पर च्या साह्याने त्यासाठी लागणाऱ्या गिट्टी व सिमेंट नेले जाते. परंतु काही दिवसांपासून समृद्धी महामार्गाच्या वाहनांमुळे राज्य महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक वैतागून गेले आहेत.
हेही वाचा - शाळांची घंटी आजपासून वाजणार; पालकांची लेखी संमती आवश्यक
सिंदखेड राजा ते दुसरबीड पर्यंत ठीक ठिकाणी समृद्धी महामार्गाच्या अवजड वाहनामुळे अपघात होण्याची शक्यता ? आहे. राज्य महामार्गावर समृद्धी टिप्पर मधुन सिमेंट मिश्रित गिट्टी रस्त्यावर जवळपास अर्धा ते एक किलोमीटर पडत आहे, त्यामुळे महामार्गावर सिमेंट मिश्रित गिट्टी स्तर पहायला मिळत आहे,तरी सुद्धा टिप्पर चालकांचे दुर्लक्ष करत आहे. समृद्धी महामार्गावर असलेले टिप्पर चालक विनाकारण गिट्टी मिश्रित सिमेंट विनाकारण महामार्गावर काही वेळेस टिप्पर काही प्रमाणात हायड्रोलिक करून महामार्ग खराब करण्याचे काम करत आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाचे अधिकारी व कर्मचारी दररोज याच मार्गावरून प्रवास करतात तरी सुद्धा सुद्धा त्यांना महामार्गावर साचलेले खच दिसत नाही.
हेही वाचा - भाजप म्हणतेय, शाळा बंदच ठेवा; गरिबाच्या मुलांना मोफत स्मार्ट फोन द्या
परंतु इतर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. तर दुचाकी वाहन चालकांना घसरण्याची भीती वाटत आहे त्यामुळे दुचाकी चालवताना मुठीत जीव घेऊन चालवावी लागते. काही काही दिवस आगोदर सावखेड तेजन फाट्याजवळ असलेल्या गतिरोधक जवळ समृद्धी महामार्गाच्या गिट्टी असलेल्या टिप्पर चालकाने चालू हायड्रोलिक करून जवळपास अर्ध्याच्यावर गिट्टी महामार्गावर सांडून दिली होती.त्यामुळे महामार्ग सोडून वाहनचालकांना रस्त्याच्या बाजूने वाहन यावे लागत होते.
हेही वाचा - ह्रदयद्रावक! चारित्र्यावर संशय; पोटात चार महिन्याचे बाळ असतानाही पूनमने गळफास लावून केली आत्महत्या
काही वेळ वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती. त्यानंतर आजूबाजूच्या नागरीकांनी रस्त्यावर असलेल्या गिट्टीचा गंज वैयक्तिक कामासाठी महामार्गावर पडलेली गिट्टी भरून नेण्यात आले होती. किनगांव राजा येथील पातळ गंगा नदीच्या जवळ समृद्धी महामार्गाच्या टिप्पर चालकाने रात्री सिमेंट मिश्रित गिट्टी टाकून महामार्गावर वाहन चालकांना अडथळा निर्माण करण्याचे काम करत आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या प्रशासनाने याकडे लक्ष देऊन टिप्पर चालकांना समज देण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा - स्पर्श विरहित दर्शन व्यवस्थेचा शेगाव पॅटर्न
महामार्गावर समृद्धी महामार्गाची टिप्पर सुसाट
सिंदखेड राजा तालुक्यामध्ये समृद्धी महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे कामासाठी लावण्यात आलेले टिप्पर हे सुसाट वेगाने धावत असतात त्यामुळे समोरील वाहनचालकांच्या मनामध्ये भीती निर्माण होत असल्यामुळे काही वेळेस अपघात होतात. सुसाट वेगाने धावणाऱ्या टिप्पर कडे समृद्धी महामार्गाच्या प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सुसाट वेगवान धावणाऱ्या टिप्पर वर कार्यवाही करण्याची मागणी नागरिक करत आहे. त्यामुळे सुसाट धावणाऱ्या टिप्पर वर पोलीस कार्यवाही करणार काय ? असा उपस्थित होत आहे.
राज्य महामार्गावर पडलेली सिमेंट मिश्रित गिट्टी हे आमच्या समृद्धी महामार्गावरील वाहनांचे आहे काय ? हे पहावे लागेल असल्यास समृद्धी महामार्गावर चालणाऱ्या वाहन चालकांना समज दिला जाईल.
- हिमांशू पाटील, उपअभियंता समृद्धी महामार्ग, सिंदखेड राजा
(संपादन - विवेक मेतकर)