
सुमारे २२ वर्षापूर्वी गुजरातमध्ये झालेल्या भूकंपामध्ये त्याचा पाय गेला. त्यामुळे दारोदार भटकंती करून भिक्षा मागण्याची वेळ त्याचेवर आली. मात्र भिक्षाही कोणी देईना. अशा व्याकूळ स्थितीत सापडलेल्या दिव्यांग दीपकला येतील अस्तिरोग तज्ज्ञ डॉ.विक्रांत इंगळे यांनी मोफत कृत्रिम पाय बसवून दिला आणि त्यानंतर आनंदविभोर होऊन, ‘साहेब, मी आता जेन्टलमेन होणार’, असे भावउद्गार दीपकने व्यक्त केले.
अकोला : सुमारे २२ वर्षापूर्वी गुजरातमध्ये झालेल्या भूकंपामध्ये त्याचा पाय गेला. त्यामुळे दारोदार भटकंती करून भिक्षा मागण्याची वेळ त्याचेवर आली. मात्र भिक्षाही कोणी देईना. अशा व्याकूळ स्थितीत सापडलेल्या दिव्यांग दीपकला येतील अस्तिरोग तज्ज्ञ डॉ.विक्रांत इंगळे यांनी मोफत कृत्रिम पाय बसवून दिला आणि त्यानंतर आनंदविभोर होऊन, ‘साहेब, मी आता जेन्टलमेन होणार’, असे भावउद्गार दीपकने व्यक्त केले.
मुळचा अकोल्याचा दीपक नृपनारायण हा २२ वर्षापूर्वी कामानिमित्त गुजरातमध्ये गेला होता. तेथे आलेल्या भूकंपामध्ये त्याचा पाय गेला. त्यामुळे त्याच्यावर दारोदार भिक्षा मागूण उदरनिर्वाह करण्याची वेळ आली.
त्याची ही परिस्थिती जाणत सूर्यचंद्र हॉस्पिटलचे संचालक अस्तिरोग तज्ज्ञ डॉ.विक्रांत इंगळे यांनी दीपकला १२ डिसेंबर २०२० रोजी स्थानिक त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मोफत कृत्रिम पाय बसवून दिला. त्यानंतर आनंदविभोर होऊन दीपकने आता भिक्षा मागून जगायचे नसून स्वाभिमानाने आणि जेन्टलमेन होऊन जगण्याचा संकल्प केला.
यावेळी डॉ.विक्रांत इंगळे म्हणाले, रुग्णसेवा हीच जगण्याचा नवा आयाम देणारी सेवा आहे. वैद्यकीय क्षेत्र हे व्यवसायाचे क्षेत्र नसून, सेवेचे क्षेत्र आहे. यामध्ये जितके समाधान आणि समाजसेवा करता येऊ शकते तितके कुठेही मिळत नाही. दीपक सारख्या अनेक दिव्यांगाना भिक्षा मागून नव्हे तर स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला
. या सामाजिक कार्यात वैभव बोळे, प्रा.श्रीकांत इंगळे, अरविंद इंगळे, डॉ.निलेश गायकवाड, डॉ.संदीप वानखडे, डॉ.निकिता बिस्वास, गौरव रौंदले, प्रसाद वालोकर, स्मिता गुडेकर, प्रिया डवळे, सबा सय्यद, साधना खिल्लारे, प्रीती होरोळे, राणी खंडागळे, राजू राऊत, विलास इंगळे, राहुल इंगळे, अर्जून दामोदर, भावना भोकसे आदींनी सहकार्य दिल्याचे डॉ.विक्रींत इंगळे यांनी सांगितले.
(संपादन - विवेक मेतकर)