esakal | जागेच्या वादातून केली शिक्षकाची हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Teacher killed in land dispute

कान्हेरी सरप गावाजवळ जागेच्या वादातून बार्शीटाकळी येथील रहवासी शिक्षक जुबेर अहमद खान शफाकत उल्ला खान यांच्या खून झाला.आरोपींना अटक करण्यात आली असून, परिसरात तनावपूर्ण शांतता आहे.

जागेच्या वादातून केली शिक्षकाची हत्या

sakal_logo
By
संजय वाट

बार्शीटाकळी (जि. अकोला) : कान्हेरी सरप गावाजवळ जागेच्या वादातून बार्शीटाकळी येथील रहवासी शिक्षक जुबेर अहमद खान शफाकत उल्ला खान यांच्या खून झाला.आरोपींना अटक करण्यात आली असून, परिसरात तनावपूर्ण शांतता आहे.


शिक्षकावर कान्हेरी सरप गावाजवळ गुरुवारी आरोपींनी धारदार शस्त्राने प्राण घातक हल्ला करून गंभीर जखमी केले होते. मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव झाल्याने त्यांना परीसरातील नागरिकांनी त्वरीत सर्वोपचार रुग्णालयात भरती केले. नंतर खासगी रुग्णालयात भरती केले.

मात्र उपचार सुरू असताना रात्री आठ वाजता दरम्यान जखमी शिक्षक जुबेर अहमद खान यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी अकोला खदान पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोहम्मद जुबेर गोहम्मद हारून व मोहम्मद उमेर या दोन आरोपींना कौलखेड परिसरात शस्त्रासह अटक केली. हे दोन्ही आरोपी अकोल्यातील फिरदोस कॉलीनी येथील रहिवासी असल्याचे समजते.

या आरोपींना न्यायालयात हजर केले असता ता. १९ ऑक्टोबरपर्यंत पीसीआर देण्यात आला. मृतक शिक्षक जुबेर अहमद खान यांच्या पार्थिवाचा शुक्रवारी दफनविधी करण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पोलिस स्टेशनच्या गेट समोर आरोपीनां फाशीची शिक्षा देण्याची मागणी सुद्धा नागरिकांनी केली.

यावेळी बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांनी चोख बंदोबस्त लावला होता. जमावाला शांत करण्याचे पर्यंतसुद्धा समाज बांधवांनी केले. बार्शीटाकळी पोलिसांनी आरोपींविरुद्ध० कलम ३०७,३०२,३४ नुसार गुन्हा दाखल केला.

(संपादन - विवेक मेतकर)