कोरोनाचे आणखी दोन बळी; २६ नवे पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 29 October 2020

कोरोना विषाणू संसर्गमुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने बुधवारी (ता. २८) दोन रुग्णांचा बळी गेला. याव्यतिरीक्त दिवसभरात २६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. मृत्यू झालेला एक रुग्ण येवला ता. बार्शीटाकळी येथील ७० वर्षीय पुरुष आहे. त्याला २७ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते.

अकोला  :  कोरोना विषाणू संसर्गमुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने बुधवारी (ता. २८) दोन रुग्णांचा बळी गेला. याव्यतिरीक्त दिवसभरात २६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. मृत्यू झालेला एक रुग्ण येवला ता. बार्शीटाकळी येथील ७० वर्षीय पुरुष आहे. त्याला २७ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू नवानगर बाळापूर येथील ७८ वर्षीय वर्षीय पुरुषाचा गेला. त्याला २६ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते. सदर दोन बळीनंतर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या २७६ झाली आहे.

कोरोना विषाणून संसर्ग तपासणीचे बुधवारी (ता. २८) १६१ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १३५ अहवाल पॉझिटिव्ह तर २६ अहवाल निगेटिव्ह आले. संबंधित रुग्ण रामदास पेठ येथील पाच, मूर्तिजापूर, तोष्णीवाल लेआऊट व शास्त्री नगर येथील दोन, तर उर्वरित गोडबोले प्लॉट, गणेश नगर, मलकापूर, सिव्हील लाईन, भिरडवाडी, बाळापूर, शिवणी, व्ही.एच.बी. कॉलनी, बार्शीटाकली, मोठी उमरी, जीएमसी, सिंधी कॅम्प, राजंदा ता. बार्शीटाकळी, गुलजारपूरा, येवला ता. बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. नवीन रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यात आता कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३६६ झाली आहे.

१६४ रुग्णांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून बुधवारी (ता. २८) सात बिऱ्हाडे हॉस्पीटल येथून दोन, ओझोन हॉस्पीटल येथून एक, आयकॉन हॉस्पीटल येथून तीन, अकोला ॲक्झीडेंट क्लिनिक येथून दोन तर सूर्यचंद्रा हॉस्पीटल येथून एक तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण करणाऱ्या १४८ जणांना, अशा एकूण १६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आता सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ८३२०
- मृत २७६
- डिस्चार्ज - ७६७८
- ॲक्टिव्ह रुग्ण - ३६६

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Two more victims of Corona; 26 new positives