कंटेनरच्या धडकेत दुचाकी स्वाराचे पाय झाले निकामी

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 10 November 2020

चिखली येथून जालना कडे जाणाऱ्या एम.एक.१२ क्यू.डब्लू ७४२३ क्रमांकाच्या कंटेनरने स्थानिक डिग्रस चौकात दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गणेश पांडुरंग सुरुशे (वय ३८ रा.दहीद जि. बुलडाणा) यांचे दोन्ही पाय निकामी झाले तर अमोल अशोक साबळे (वय २६) हा गंभीर जखमी झाला.

देऊळगाव मही (जि. बुलडाणा)  ः चिखली येथून जालना कडे जाणाऱ्या एम.एक.१२ क्यू.डब्लू ७४२३ क्रमांकाच्या कंटेनरने स्थानिक डिग्रस चौकात दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गणेश पांडुरंग सुरुशे (वय ३८ रा.दहीद जि. बुलडाणा) यांचे दोन्ही पाय निकामी झाले तर अमोल अशोक साबळे (वय २६) हा गंभीर जखमी झाला.

अपघात घडताच घटना स्थळी हजर असलेले मोहम्मद कलीम,शिवा म्हस्के, अनिल शिंगणे ,शेख अन्सार ,प्रमोद शिंगणे, संतोष भूतेकर, यांच्या सह अनेक युवकांनी धावपळ करीत जखमीना देऊळगांवमही ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

प्राथमिक उपचार केल्या नंतर पुढील उपचारासाठी जालना येथे हलविन्यासाठी रुग्णवाहिकेच्या प्रतिक्षेत जवळपास अर्धा ते पाऊन तास १०८ रुग्णवाहेकीला संपर्क करावा लागला. परंतु गंभीर जखमी असलेल्या जखमीवर पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकाची गरज असल्यामुळे बराचवेळ जीव धोक्यात घालावा लागला.

ग्रामीण रुग्णालयात १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका उभी असून, नातेवाईक हजर नसल्याचे कारण सांगून वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल सोळंकी यांनी रुग्णवाहिका देण्यास विलंब केला. परंतु स्थानिक युवकांनी आम्ही त्यांचे नातेवाईक असल्याचे पवित्रा घेताच काही क्षणात रुग्णवाहिका हजर केली. व त्या जखमींना पुढील उपचारासाठी तात्काळ रेफर करून माणुसकी जिवंत असल्याची प्रत्यय दिला या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच कंटेनर चालकास कंटेनर सह ताब्यात घेतले पुढील तपास ए.एस.आय साळवे, राजू मोरे ,रुपेश जोरदार, सतीश जाधव, हे करीत आहे.

ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांची ग्रामस्थांना दमदाटी
कंटेनर व दुचाकी अपघातास्थळी असलेले स्थानिक यूवकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन जखमी अवस्थेत असलेल्या सुरुशे व साबळे हे अपघातात गंभीर झाले आहे.त्यांच्यावर तातडीने योग्यरित्या उपचार करुण मद्त करा अशी विनंती कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना युवकवर्ग व ग्रामस्थ करीत होते.परंतु नेहमीप्रमाणे उशिरा हजर होऊन मुजोरी भाषेत डॉ.विशाल सोलंकी यांनी आक्रमक शैलीत दमदाटी करण्यास सुरुवात केली यामुळे काही वेळ ग्रामीण रुग्णालयात तनाव निर्माण झाला होता.अशा मुजोर वैद्यकीय अधीक्षक यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी अनिल मंसुबराव शिंगणे यांनी केली.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Two-wheeler rider fails in container accident