शेतात काढून ठेवलेले सोयबिन पावसामुळे भिजले असेल  तर काय कराल?

 Akola News: What will you do if the soybeans removed from the field get wet due to rain?
Akola News: What will you do if the soybeans removed from the field get wet due to rain?

कारपा (जि.वाशीम) :मागील दोन दिवसापासून परिसरात सर्वदूर पाऊस होत आहे सध्या सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात आहे काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून गोळा न करता शेतात वाळवण्यासाठी तसेच ठेवलेले आहे

.दोन दिवसात झालेल्या पावसामुळे सदरचे सोयाबीन भिजले असल्यास ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन चा विमा उतरविला आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान झाले असल्यास काढणीपश्‍चात नुकसान भरपाई या सदराखाली पिक विमा मिळू शकतो.

यासाठी पीक विम्यासाठी सोयाबीन अधिसूचित क्षेत्रातील शेतात सोयाबीन कापणी करून सुकवण्यासाठी पसरून ठेवलेल्या ठिकाणी कापणीपासून 14 दिवसात गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानीस ग्राह्य धरता येतात.

यासाठी शेतकऱ्यांनी सदरची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी व कृषी विभागास देणे बंधनकारक आहे. यामध्ये नुकसान काळविताना सर्वे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळवणे ही बंधनकारक आहे.

प्राप्त झालेल्या सुचनेनंतर संयुक्त समिती शेतकऱ्याच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पहाणी करेल या मध्ये विमा कंपनी प्रतिनिधी, कृषि अधिकारी व संबंधित शेतकरी यांचा समावेश असेल, पहाणीनंतर नुकसानीचा अहवाल 10 दिवसात सादर करण्यात येईल.

त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांनी गूगल प्ले स्टोअर वरून crop insurance हे ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती द्यावी किंवा 18001024088 /180030024088 या टोल फ्री क्रमांकावर किंवा rgicl.pmfby@relinceada.com या ई-मेल वर किंवा कृषि विभागाच्या कार्यालयात अर्ज करून कळवावे.

कुठल्याही तक्रार संबधित काही अडचण आल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा जिल्हा व्यवस्थापक अर्जुन सोडा, जिल्हा समन्वयक डी. एन. बोबडे असे आव्हान मानोरा तालुका कृषी अधिकारी यांनी मानोरा परिसरातील सर्व शेतकरी यांना केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com