ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेच्या इंजिनवर हक्क कुणाचा?

प्रा.अविनाश बेलाडकर 
Saturday, 24 October 2020

ब्रिटिश कालीन शकुंतलेची प्रतिकृतीचे खरे हक्कदार मूर्तिजापूर रेल्वे स्थानक आहे. असे असतानाही हे इंजन अकोला रेल्वे स्थानकाची शोभा वाढवत आहे.

मूर्तिजापूर (जि.अकोला) : ब्रिटिश कालीन शकुंतलेची प्रतिकृतीचे खरे हक्कदार मूर्तिजापूर रेल्वे स्थानक आहे. असे असतानाही हे इंजन अकोला रेल्वे स्थानकाची शोभा वाढवत आहे.

ते मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर ठेवण्यात यावे येथील रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करून उड्डाणपुलाची मागणी एका निवेदनाद्वारे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्याकडे केली आहे.

नामदार संजय धोत्रे यांच्या प्रयत्नाने अकोल्याच्या रेल्वे स्थानकाचे सौंदर्यीकरण होत आहे. त्याचप्रमाणे मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, या रेल्वेस्थानकावर संत गाडगे महाराजांची ही कर्मभूमी असल्याने त्यांचा ठिकाणी पुतळा उभारावा, असे या निवेदनात नमुद आहे. रेल्वे स्थानकाचा इतिहास लुप्त होऊ नये याकरिता ब्रिटिश कालीन शकुंतलेचे इंजीन मूर्तिजापूर स्थानकाचे सौंदर्य वाढविण्यासाठी त्याची प्रतिकृती या ठिकाणी ठेवण्यात यावी. मागील सात-आठ महिन्यांपासून असलेल्या लाॅकडाऊन मुळे प्रत्येक काम ठप्प आहे.

अनेक महिन्यापासून शकुंतला त्या मार्गाने धावते ते बंद करण्यात आलेला आहे शासनाने त्वरित पावले उचलून शकुंतले ची परंपरा ब्रॉडगेज मध्ये रूपांतर करून सुरू व्हावी याकरिता आपण आपल्या परीने व्यवस्था करावी जेणेकरून अचलपूर यवतमाळ मुर्तीजापुर कारंजा दर्यापूर व इतर येणारे गावातील प्रवाशांना समाधान होईल.

तसेच चिखली रेल्वे गेट क्रमांक ५० येथेसुद्धा उड्डाणपुलाची निर्मिती करावी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ आहे पंधरा मिनिटांनी गाडी पास करण्यासाठी रेल्वे गेट बंद करावे लागते त्यामुळे वाहनांना खोळंबा होतो. या बाबीची दखल घेऊन या ठिकाणी उड्डाणपुलाची निर्मिती करावी व या भागातील १९ गावातील ग्रामस्थांना दिलासा द्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे.

सर्वसामान्यांना पडणारे प्रश्न
अचलपूर-यवतमाळ दरम्यान धावणारी ‘शकुंतला’ अलिकडे पावसाळ्यात बंद व्हायची तेव्हा आपल्यामोजक्या पाच डब्यांसह याच मूर्तिजापूर स्थानकावर पावसाळाभर विश्रांती घ्यायची. आता मात्र हा लोहमार्ग बंद करण्याचा घाट घातल्यानंतर तिचे इंजिन अकोला स्थानकाची शोभा का वाढवते? जागा अधिग्रहीत करण्याची गरज नाही. दारव्यापासून पुढे ब्रॉडगेज होतच आहे. मग दारव्ह्यापर्यंत ब्रॉडगेज करायला खर्च तो किती लागणार? लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय?

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Who owns the engine of British Shakuntala Railway?