पुरवठा विभागानी पकडला तांदुळाचा ट्रक कुणाचा?

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 24 November 2020

मानोरा ते दिग्रस रोडवर सावली फाट्याजवळ तांदुळाने भरलेला ट्रक दि 21 रोजी रात्री 11 च्या दरम्यान तहसीलदार संदेश किर्दक व पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके यांनी पकडून पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आला

मानोरा (जि.वाशीम) : मानोरा ते दिग्रस रोडवर सावली फाट्याजवळ तांदुळाने भरलेला ट्रक दि 21 रोजी रात्री 11 च्या दरम्यान तहसीलदार संदेश किर्दक व पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके यांनी पकडून पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आला

मानोरा ते दिग्रस रोडवर ट्रक क्र एम एच 31 एफ सी 9974 क्रमांकचा ट्रक तांदूळ घेऊन जात असताना तहसीलदार संदेश किर्दक व पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके यांनी पकडला पकडलेले वाहन मानोरा पोलीस स्टेशनच्या आवारात लावण्यात आला

हेही वाचा - शाळांची घंटी आजपासून वाजणार; पालकांची लेखी संमती आवश्यक

परंतु हा तांदुळचा ट्रक कोणाचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस स्टेशनमध्ये वाहनात भरलेला तांदूळाचे काही कट्टे उघडून पाहण्यात आले. त्यानंतर सर्व कट्टे वापस भरण्यात आले. ही पाहणी केवळ अर्ध्या तासात आटोपली या संदर्भात सोळंके मॅडम यांना विचारणा केली असता हा तांदूळ आमचा नाही असे सांगून हात वर करण्यात आले. 

हेही वाचा -  ह्रदयद्रावक! चारित्र्यावर संशय; पोटात चार महिन्याचे बाळ असतानाही पूनमने गळफास लावून केली आत्महत्या

त्यांच्या कडे रितसर पावती आहे असे सांगण्यात आले तर ह्या पावत्या आल्या कुठून तालुक्यात कोणत्याच प्रकारचे तांदूळ उत्पादन होत नसतानाही मोठ्या प्रमाणावर तांदूळाची वाहतूक होते तर हा माल येतो कुठून जातो कुठे मानोरा येथे कोण घेतो असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा -  भाजप म्हणतेय, शाळा बंदच ठेवा; गरिबाच्या मुलांना मोफत स्मार्ट फोन द्या

तालुक्यात राशन माफिया सक्रिय आहे असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही रात्रीच्या वेळी ट्रक पकडला जातो पण दुकानात खरेदी केल्या जाते त्या दुकानाकडे प्रशासनाचे दुलक्ष का? असाही प्रश्न निर्माण होत आहे प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन हा गोरख धंदा खुलेआम सुरू आहे प्रकरणात अखेर पाणी मुरते कुठे,कारवाई दुकानावर होईल का ,गरीब जनतेच्या टाळू वरील लोणी खाणे बंद होईल का असे तालुक्यातील नागरिकात बोलले जात आहे

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Whose truck of rice was seized by the supply department?