Akola: चालकाने पोलिसाच्या अंगावर घातला आयशर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Crime News

अकोला : चालकाने पोलिसाच्या अंगावर घातला आयशर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बाळापूर (जि. अकोला) : धुळे-कोलकात्ता राष्ट्रीय महामार्गावरील बाळापूर पोलिस मदत केंद्राजवळ चालकाला अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसाच्या अंगावर भरधाव आयशर नेल्याची घटना मंगळवारी (ता. १६) सकाळी घडली आहे. या अपघातात पोलिस कर्मचारी प्रदीप चिकटे गंभीर जखमी झाले असून, त्यांना अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी पोलिस कर्मचाऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

बाळापूर जवळील महामार्ग पोलिस मदत केंद्राजवळ वाहतूक पोलिसाने आयशर चालकाला गाडी थांबवण्यासाठी इशारा केल्याने चालकाने गाडीच अंगावर घातल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.१६) सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. यात पोलिस कर्मचारी प्रदीप चिकटे गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

हेही वाचा: पुणे : कोंबिग ऑपरेशन करून गुन्हेगारांवर कारवाई

आरोपी चालकाला बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चालक एमएच-४८-एजी-३३९२ या क्रमांकाचा आयशर घेऊन खामगावहून अकोल्याच्या दिशेने भरधाव जात होता. यावेळी बाळापूर राष्ट्रीय महामार्गावरील महामार्ग मदत केंद्राजवळ पोलिस कर्मचारी प्रदीप चिकटे यांनी चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा केला.

मात्र, चालकाने वाहन थेट चिकटे याच्या अंगावर घातले. यात चिकटे यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान अपघात घडलेल्या ठिकाणीच उपस्थित असलेल्या पोलिसांनी चालकाला पकडले. चालकाला पोलिसांनी अटक करून त्याला बाळापूर पोलिस ठाण्यात नेले. या घटनेमुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: पुणे : समाविष्ट मतदारांचे फॉर्म ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घेण्याची मागणी

२०१६ च्या घटनेची पुनरावृत्ती

बाळापूर शहरानजीक राष्ट्रीय महामार्ग मदत केंद्रावर पोलिस कर्मचारी नितीन निखार (वय २८) महामार्गाच्या कडेला उभे राहून कर्तव्य बजावत असताना खामगावकडून भरधाव येणाऱ्या ट्रक ट्रेलरने त्यांना जबर धडक दिली होती. ही घटना २८ जून २०१६ रोजी सकाळी अकरा वाजता घडली होती. या अपघातात निखार यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला होता.

loading image
go to top