अकोला पोलिसांची आता ‘नो मास्क नो राईड’ मोहीम

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 8 October 2020

मागील दहा दिवसांपासून शहर वाहतूक शाखा अकोला शहरात ‘नो मास्क नो सवारी’ ही मोहीम राबवित आहे. या मोहिमेनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यात वाहतूक शाखेकडून ही मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेचा सकारात्मक परिणाम अकोला शहरात दिसायला सुरवात झाली आहे. त्यामुळे आता अकोला पोलिसांनी ‘नो मास्क नो राईड’ ही दुचाकी व चार चाकी वाहनांसाठी मोहीम सुरू केली आहे.

अकोला  ः मागील दहा दिवसांपासून शहर वाहतूक शाखा अकोला शहरात ‘नो मास्क नो सवारी’ ही मोहीम राबवित आहे. या मोहिमेनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यात वाहतूक शाखेकडून ही मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेचा सकारात्मक परिणाम अकोला शहरात दिसायला सुरवात झाली आहे. त्यामुळे आता अकोला पोलिसांनी ‘नो मास्क नो राईड’ ही दुचाकी व चार चाकी वाहनांसाठी मोहीम सुरू केली आहे.

अकोला शहरात प्रचंड संख्येने धावणाऱ्या ऑटो चालकांनी कारवाईच्या भीतीने का होईना मास्क वापरण्यास सुरवात केली. सवारीला सुद्धा मास्क घालण्यासाठी आग्रह करतांना दिसले. याचा सकारात्मक परिणाम कोरोनाचे संक्रमण काही प्रमाणात का होईना कमी होताना दिसत आहे. कोरोनाचा हा घटता ग्राफ कायम ठेवण्यासाठी आता शहर वाहतूक शाखेने कंबर कसली आहे.

आगामी सण उत्सव काळातील गर्दी लक्षात घेता ‘नो मास्क नो सवारी’ प्रमाणेच पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांचे मार्गदर्शनात शहर वाहतूक शाखा पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांचे नेतृत्वात आता ‘नो`मास्क नो राईड’, ही मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

दुचाकी चालविताना मास्क आवश्यक राहील. विशेष करून दुचाकीवर डबल सीट जातांना मोटारसायकल चालविणाऱ्या व मागे बसलेल्या व्यक्तीला मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.

...तर दंडात्मक कारवाई
मास्क शिवाय मोटारसायकल चालविणाऱ्या चालकाला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी दिला आहे. नागरिकांनी करोना संक्रमण रोखण्यासाठी सदर मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Polices No Mask No Ride campaign now