esakal | जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून २२ उमेदवारांची माघार
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Political News 22 candidates withdraw from Akola District Central Co-operative Bank elections

 दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक येत्या २० फेब्रुवारीला होत आहे. त्याकरिता इच्छुकांनी अर्ज सादर केले होते. बुधवारी (ता.१०) मात्र त्यांचेपैकी २२ उमेदवारांनी अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली असून, १८ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून २२ उमेदवारांची माघार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक येत्या २० फेब्रुवारीला होत आहे. त्याकरिता इच्छुकांनी अर्ज सादर केले होते. बुधवारी (ता.१०) मात्र त्यांचेपैकी २२ उमेदवारांनी अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली असून, १८ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.


विदर्भच नव्हे महाराष्ट्रात सातत्याने सक्रीयपणे काम करण्यासाठी ओळख बनलेल्या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. जिल्हा बँकेचे अकोला व वाशीम जिल्हा कार्यक्षेत्र आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी या सात आणि वाशीम जिल्ह्यातील वाशीम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा या सहा अशा एकूण १३ तालुक्यातील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

हेही वाचा - राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू

निवडणुकीच्या अनुषंगाने विविध टप्पे जाहीर झाले होते. यात २२ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होते. २५ जानेवारी रोजी अर्जांची छाननी आणि २७ जानेवारी रोजी रिंगणातील उमेदवारांची नावे प्रसिद्ध करण्यात येऊन १० फेब्रूवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली होती.

त्यानुसार २२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून, १८ उमेदवार निवडणूक लढणार आहेत. ११ फेब्रूवारीला रिंगणात राहलेल्या या उमेदवारांना निवडणूक चिन्ह मिळेल. त्यानंतर २० फेब्रूवारीला प्रत्यक्ष मतदान होईल. या निवडणुकीसाठी दोन्ही जिल्ह्यातील सुमारे १२०० मतदार मतदान करू शकणार आहेत.

हेही वाचा - जिल्हा बँक निवडणुक; मतदार अज्ञातस्थळी; उमेदवारीचा गुंता कायम

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमुळे आता महिनाभर सहकार क्षेत्राचे वातावरण तापणार आहे. अनेक वर्षांपासून या बँकेवर कोरपे यांची सत्ता टिकून आहे. कोरोनामुळे सहकार क्षेत्रातील निवडणुका आजवर लांबणीवर टाकण्यात आलेल्या होत्या. परंतु निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागली आहे. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा उपनिबंधक विनायक कहाळेकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करीत आहेत.

हेही वाचा - पहिलाच प्रयोग; अकोल्यात साकारतेय चाईल्ड फ्रेंडली पोलिस ठाणे

चुरशीची निवडणूक होण्याची चिन्हे
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातत्याने चोख व्यवहार, कर्ज वसुली व विविध उपक्रमांमुळे चर्चेत असते. विदर्भातील बऱ्याच जिल्हा बँका आर्थिक अडचणीत असताना अकोला जिल्हा बँक मात्र कायम नफ्यात आहे. बँकेने विविध क्षेत्रात नावलौकीक मिळवला. त्यामुळे या बँकेच्या निवडणुकीकडे सहकारातील सर्वच दिग्गजांचे लक्ष वेधले आहे. बँक संचालक बनण्यासाठी सहकारातील अनेक जण गुडख्याला बाशींग बांधून तयार आहेत.

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

(संपादन - विवेक मेतकर)

loading image