राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस, थेट वरिष्ठांकडे तक्रारीचा ओघ सुरू

 Akola Political News Internal squabbles between political parties, complaints flow directly to seniors
Akola Political News Internal squabbles between political parties, complaints flow directly to seniors

अकोला, :  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमधील अंतर्गत धुसफूस उघड चौहाट्यावर येत आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता वचित बहुजन आघाडीमध्येही थेट वरिष्ठांकडे तक्रारी करण्याचे प्रकार वाढले आहेत.
जिल्ह्यातील राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस वाढल्या आहेत. महानगरपालिका निवडणूक जवळी आली असताना तक्रारीचा ओघ वाढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नुकतेच अकोल्यात येऊन गेलेत. त्यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी थेट विधान परिषदेच्या आमदाराविरुद्धच फोडाफोडीच्या राजकारणाचे आरोप केले होते.

हेही वाचा - राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू

मूर्तिजापूरच्या सभेत युवक आघाडीच्या जिल्हाध्यक्षांविरुद्ध तक्रार झाली होती. त्यापूर्वी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस थेट पत्रकार परिषदेच उजेडात आल्यामुळे मावळते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती.

आता वंचित बहुजन आघाडीतील धुसफूसही उघड झाली आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सूचना देण्यासाठी थेट पत्रच काढण्यात आले. सोशल मीडियावरुन जाहीर तसेच वरिष्ठांना फोन करून टीका टिप्पणी करीत खोडसाळपणा करण्याचे प्रकार वंचित बहुजन आघाडीमध्ये वाढले आहेत.

त्यामुळे कोणाच्याही सूचना, तक्रारी किंवा आक्षेप लेखी स्वरुपात व सर्व जिल्हाध्यक्ष व महासचिवांच्या मार्फतच कराव्यात असा आदेश काढण्यात आला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे फोन किंवा व्हॉट्स ॲपद्वारे येणाऱ्या तक्रारीची दाखल घेतली जाणार नाही.

आपापल्या भागातून येणाऱ्या तक्रारीची सोडवणूक संबंधित जिल्हाध्यक्ष व महासचिवांनी त्यांच्या स्तरावरच करावी. जी तक्रार वरिष्ठ पातळीवरील आहे तीच तक्रार विभागीय कार्यकारिणीकडे वर्ग करावी. थेट मुंबई ऑफिस किंवा वरिष्ठ नेत्यांकडे फोन किंवा व्हॉट्स ॲपद्वारे तक्रार करू नये. फक्त लेखी तक्रारीची दाखल जिल्हाध्यक्ष व महासचिव व विभागीय कार्यकारिणीने घ्यावी. तोंडी, फोनवरील किंवा व्हॉट्स ॲपद्वारे येणाऱ्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही, असा फतवाच उपाध्यक्षांच्या स्वाक्षरीसह काढवा लागण्याची वेळ वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांवर आली आहे.

संपादन - विवेक मेतकर

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com