निःस्वार्थ समर्पण हे स्वयंसेवकत्व! - सरसंघचालक डॉ.मोहन भागवत 

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 2 February 2021

करिअर म्हणजे प्राप्ती नाही. मनुष्य विकसित झाल्यावर त्याला प्राप्त गोष्टींचे वाटप त्याने केले पाहिजे. समर्पित होणे हे जीवन आहे. असे निःस्वार्थ समर्पण हेच स्वयंसेवकत्व आहे. असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत यांनी येथे व्यक्त केले.

अकोला : करिअर म्हणजे प्राप्ती नाही. मनुष्य विकसित झाल्यावर त्याला प्राप्त गोष्टींचे वाटप त्याने केले पाहिजे. समर्पित होणे हे जीवन आहे. असे निःस्वार्थ समर्पण हेच स्वयंसेवकत्व आहे. असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत यांनी येथे व्यक्त केले. आज त्यांच्या हस्ते शंकरलाल उर्फ काकाजी खंडेलवाल यांच्या जन्मशताब्दी समारोह निमित्त ‘संघ समर्पित काकाजी‘ या ग्रंथाचे विमोचन करण्यात आले. यावेळी त्यांनी हे विचार व्यक्त केले.

यावेळी बोलताना मोहनजी पुढे म्हणाले की, स्वयंसेवकत्व म्हणजे दुसऱ्यापासून अपेक्षा न करणे होय. पण, स्वतः ते करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या कविता, लेख याचे समर्पण राष्ट्रासाठी केले होते. इतकेच नव्हे तर दोघे बंधू कैदेत असताना सावरकरांनी सात भाऊ असते तर ते देखील मातृभुमीला समर्पित केले असते. असे त्यांचे उच्च विचार सर्मपणाचा दाखला देत मोहनजींनी यावेळी सांगितला.

हेही वाचा - बारा मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या वडिलांना लेकींचा अखेरचा निरोप

काकाजीं खंडेलवाल यांच्या कार्यातून समाजाला सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळणार आहे. राजकीय जीवनात असताना काकाजी खंडेलवाल यांना संघाने दिलेल्या जबाबदारी एक स्वयंसेवक या नात्याने पुर्ण केली. त्यांनी राजकीय जीवन सोडून संघ कार्यात स्वतःला झोकून दिल्याची आठवण मोहनजींनी यावेळी सांगितली. विविध क्षेत्रात दिलेली भुमिका काकाजींनी करताना स्वयंसेवक ही भुमिका कायम ठेवल्याचे मोहनजी म्हणाले.

लाभाविणी करी प्रिती, अशी कळव्याची जाती असे म्हणत काकाजींच्या समाजकार्याची आठवण त्यांनी सांगितली. काकाजी हे मनुष्य प्रिय होते. त्यांनी कुणाची उपेक्षा केली नाही. सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना जवळ केले. त्यांनी शेकडो लोकांना जोडले. प्रचारक गेलेल्या व्यक्तींच्या परिवारांशी संवाद व पालकत्व काकाजींनी ठेवले होते. अशी आठवण मोहनजींनी यावेळी सांगितली.

हेही वाचा -  21 वर्षांत चार नाही तर चौदा झालेत सरपंच 

काकाजींच्या जीवनावरील स्मृतीग्रंथ उत्कृष्टपणे तयार केला गेल्याचे प्रशिस्तपत्रचं देत मोहनजींनी सर्वांचे अभिनंदन केले. लघुपट निर्माता स्वप्निल बोरकर यांचे देखील कौतुक केले. भारत मातेच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाची प्रस्तावना आयोजन समितीचे अध्यक्ष गोपाल खंडेलवाल यांनी केले. काकाजी यांच्या कडे संघचालक पदाचे दायित्व मोहनजी यांनीच दिल्याची आठवण गोपाल खंडेलवाल यांनी सांगितली.

१९८२ ते १९९३ या काळात तत्कालिन प्रचारक रवी भुसारी यांनी काकाजी यांच्या सोबत केलेल्या कार्य ग्रंथात रुपांतरीत करण्याची कल्पना व्यक्त केली होती. ती प्रत्यक्षात साकार झाल्याचे गोपाल खंडेलवाल म्हणाले. स्वागत समितीचे अध्यक्ष अतुल गणात्रा, गोपाल खंडेलवाल, महेंद्र कवीश्वर यांनी डॉ.मोहनजी यांचे शाल, स्मृतीचिन्हं व पुष्पगुच्छ देत स्वागत केले.

हेही वाचा - सावधान तुमची होऊ शकते फसवणूक! महिलेला गुगलवर सर्च करणे पडले दोन लाखांत

काकाजींच्या जीवनावरील लघुपटाचा काही अंश या वेळी दाखविण्यात आला. काकाजींच्या स्मृतीतील पहिला सेवा पुरस्कार उत्कर्ष शिशुगृह व गायत्री बालकाश्रमला देण्यात आला. या संस्थेचे विजय जानी व दादा पंत यांनी हा पुरस्कार मोहनजींच्या हस्ते स्वीकारला.

हेही वाचा - बातमी वाऱ्यासारखी पसरली; ऐंशी फुट खोल विहिरीत घडलं काय?

कार्यक्रमाचे सूत्रसंचालनप्रा.विवेक बिडवई यांनी केले. वैयक्तिक गीत कविता वरघट यांनी सादर केले. अतुल गणात्रा यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला. जुने शहरातील गोडबोले प्लॉट स्थित खंडेलवाल महाविद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा झाला.
 

(संपादन - विवेक मेतकर)

क्लिक करा - अकोला जिल्ह्यातील बातम्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Political News Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat Kakaji Khandelwal Smritigranth Lokarpan