Akola Rain News : पाऊस निघाला परतीला; पश्चिम विदर्भ कोरडाच ; अकोल्यात सरासरी २३ टक्के पाऊस कमी

नागपूर वेधशाळेने ता. ३० सप्टेंबर रोजी १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंतच्या पावसाच्या स्थितीबाबतची माहिती दिली आहे.
akola
akola sakal

अकोला - नैऋत्य मोसमी वारे परतीच्या मार्गावर निघाले आहेत. पावसाळ्याचे चार महिने बघता-बघता निघून गेले. अधूनमधून दमदार पावसाने हजेरीही लावली. मात्र, तरीही पश्चिम विदर्भ कोरडाच राहिला. अकोल्यासह वाशीम व बुलडाणा या वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यात पावसाची मोठी तुट आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्याचा मोठा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

नागपूर वेधशाळेने ता. ३० सप्टेंबर रोजी १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंतच्या पावसाच्या स्थितीबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांपैकी अकोला व अमरावती या दोन्ही जिल्ह्यात पावसाची मोठी तुट आहे. अकोल्यात सरासरीपेक्षा २३ टक्के कमी पाऊस झाला आहे तर अमरावतीमध्ये २७ टक्के कमी पाऊस झाला. वाशीम जिल्ह्यातही १६ टक्के कमी पाऊस झाला. यवतमाळ वगळता पश्चिम विदर्भात सरासरी एवढाही पाऊस होऊ शकला नाही. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने सिंचन प्रकल्पांची स्थिती सुधारली असली तरी अद्यापही अकोल्यातील वाण वगळता कोणताच मोठा प्रकल्प १०० टक्के भरू शकला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.

अकोला, अमरावती दुष्काळाच्या छायेत

पश्चिम विदर्भातील अकोला व अमरावती या दोन जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत पावसाची तुट २० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात आहे. हवमान विभागाने पावसाच्या बाबतीतील या दोन्ही तालुक्यांना दुष्काळाच्या छायेत दर्शविले आहे.

akola
Akola News : रेबीजचा धोका टाळण्यासाठी श्वानांचे लसीकरण करा - डॉ. बुकतारे

पश्चिम विदर्भातील पावसाची स्थिती (मि.मी.)

जिल्हा प्रत्यक्षात झालेला पाऊस सरासरी पाऊस तुट

अकोला ५३२.३ ६९४.२ - २३ कमी प्रमाणात

अमरावती ६०२.३ ८२२.९ -२७ कमी प्रमाणात

बुलढाणा ५९४.१ ६४७.६ - ८ सामान्य

वाशीम ६५०.० ७७२.३ -१६ सामान्य

यवतमाळ ९२४.४ ८०८.८ १४ सामान्य

akola
Akola News : शेतकरी आत्महत्येची दहा प्रकरणे मदतीसाठी पात्र; तीन प्रकरणांची फेरचौकशी व तीन अपात्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com