सातशे जागा रिक्तच; उद्या प्रवेशाची अंतिम संधी

सुगत खाडे  
Sunday, 30 August 2020

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उशीराने सुरू झालेली आरटीई प्रवेश प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून सुद्धा अद्याप केवळ एक हजार ६२७ विद्यार्थ्यांनाच निश्चित प्रवेश मिळाला आहे.

अकोला :  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उशीराने सुरू झालेली आरटीई प्रवेश प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून सुद्धा अद्याप केवळ एक हजार ६२७ विद्यार्थ्यांनाच निश्चित प्रवेश मिळाला आहे.

दोन हजार ३२३ जागांपैकी ६९६ जागा रिक्त असल्याने सोडत लागलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ३१ ऑगस्टपर्यंत शाळांमध्ये जावून प्रवेश घेण्याची शेवटची संधी आहे. त्यानंतर मात्र प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.

हेही वाचा- या सापाच्या किंमतीचा तुम्हाला अंदाजही नाही येणार, पण ब्लॅक मार्केटमध्ये इतकी डिमांड असण्याचं कारण तरी काय?.

यावर्षी आरटीई कायद्याअंतर्गत जिल्ह्यातील २०१ शाळांमध्ये दोन हजार ३२३ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया मागील फेब्रुवारी, मार्च महिन्यात पार पडली होती.

बापरे! जिल्हा परिषदेचे सहा अधिकारी, कर्मचारी क्वारंटाईन

अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (४ मार्च) जिल्ह्यातील ७ हजार ३३३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज केले होते; परंतु आरटीईअंतर्गत केवळ दोन हजार ३२३ विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहे. परिणामी मोफत प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या पाच हजार १० विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार नाहीत. असे असले तरी प्रवेशासाठी लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ३१ ऑगस्टपर्यंत शाळांमध्ये जावून प्रवेश निश्चित करावे लागतील.

रेशन दुकानदारांचे कमिशन सरकारी तिजोरित!
 
आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी
आरटीई प्रवेशासाठी २ हजार ३२३ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी राज्यस्तरावर सोडत (लॉटरी) काढण्यात आली. सोडतीमध्ये २ हजार २७८ विद्यार्थ्यांची आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी निवड करण्यात आली. त्यापैकी एक हजार ६२७ विद्यार्थ्यांना निश्चित प्रवेश मिळाला असून एक हजार १६८ विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देण्यात आला आहे. प्रक्रियेअंतर्गत लॉटरी लागलेल्यांसाठी प्रवेशाची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट असल्याने त्यानंतर प्रतीक्षा यादी (वेटिंग लिस्ट) मधील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola RTE Admission Process