Akola SIR Voter Notices : १.४९ लाख मतदारांना नोटिसा ; कागदपत्रांच्या पडताळणीनंतर अंतिम मतदार यादी

1.49 Lakh Akola Voters to Receive SIR Notices : अकोला जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अंतर्गत १ लाख ४९ हजार २ मतदारांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Akola SIR Voter Notices

Akola SIR Voter Notices

esakal

Updated on

अकोला : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) मोहिमेंतर्गत अकोला जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार २ मतदारांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. संबंधित मतदारांकडून आवश्यक कागदपत्रे मागविण्यात येणार असून, कागदपत्रांच्या पडताळणीनंतर आवश्यक प्रकरणांत प्रत्यक्ष सुनावणी घेतली जाणार आहे.

२४ सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार असून, ३० ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे. २८ सप्टेंबरपासून सुनावण्यांना नियमित गती दिली जाणार आहे.

विशेष सखोल पुनरीक्षणाअंतर्गत (एसआयआर) मतदार यादीची सखोल तपासणी व पडताळणी करण्यात आली. त्याअंतर्गत जिल्ह्यात मतदार यादीतील नावे, पत्ते आणि पात्रतेशी संबंधित माहिती तपासून पात्र मतदारांची नावे अचूकपणे समाविष्ट ठेवणे आणि आवश्यक दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सध्या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

Akola SIR Voter Notices
Wadegaon Robbery : वाडेगावात कोयत्याचा धाक दाखवून लाखोंचा ऐवज लंपास ; बेडरूमला बाहेरून कडी लावून शिक्षकाला कोंडले; चोर सीसीटीव्हीत कैद

त्याअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार २ मतदारांच्या नावांमध्ये विसंगती आढळल्याने संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस बजावल्याच्या तारखेपासून संबंधित मतदाराला सुनावणीसाठी किमान सात दिवसांचा अवधी देणे बंधनकारक आहे.

त्यामुळे नोटिसा बजावणे, कागदपत्रे प्राप्त करणे, त्यांची पडताळणी करणे आणि आवश्यक त्या प्रकरणांत सुनावणी घेणे, अशी टप्प्याटप्प्याने प्रक्रिया राबविली जाणार आहे. मोठ्या संख्येतील मतदारांची प्रक्रिया निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. याबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांनी माहिती दिली.

Akola SIR Voter Notices
मला वाईट वाटतं, मी का बोलले नाही.. प्रथा म्हणून डोहाळे जेवणात घडलेली ती गोष्ट; मृणाल कुलकर्णी आजही विसरलेल्या नाही

मतदारसंघनिहाय नोटिसा

मतदारसंघ मतदार संख्या

अकोट १४,२३९

बाळापूर २६,९०४

अकोला पश्चिम ३९,६९१

अकोला पूर्व ४१,८०९

मूर्तिजापूर २६,३५९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com