

Wadegaon Robbery
esakal
वाडेगाव : बाळापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाडेगाव येथील पल्हाडे लेआऊट मधिल शिक्षकांच्या घरातून अज्ञात चोरांनी कोयत्याचा धाक दाखवून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी (ता.२१) सकाळी उघडकीस आली. चोरी करताना चोर सीसीटीव्हीत कैद झाले असून, या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार वाडेगाव पातूर रस्त्यालगत असलेल्या पल्हाडे लेआउट मधील सचिन भास्कर लोखंडे यांच्या राहत्या घरी दि.२० सप्टेबरच्या रात्री अंदाजे २.४५ वाजता अज्ञात तीन चोरांनी घरात प्रवेश केला रोख २७ हजार रुपयावर हात साफ केला.
त्यानंतर जवळच असलेल्या बेडरुम मध्ये झोपी गेलेले सचिन लोखंडे यांना जागे करुन त्यांना कोयत्याचा धाक दाखवित त्याच्या हातातील चार ग्राम सोन्याची अंगठी हिसकावून घेतली व प्रतिक्षा सचिन लोखंडे यांच्या गळ्यातील ११ ग्राम वजनाचे मिनी मंगळसूत्र हिसकावून घेत, एकूण अडिच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
यावेळी चोरांनी जाताना सचिन लोखंडे यांचा मोबाईल घेवून त्या दोघांना बेडरुममध्ये कोंडून तेथून पसार झाले. बाळापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. या प्रकरणी बातमी लिहीस्तोवर कोणत्याही प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
येथील शिक्षक कॉलनीमध्ये चोराची माहिती देण्यासाठी शेजारी फोन आला व तेव्हाच संबंधित शिक्षकाच्या घरातच चोरांनी प्रवेश केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी चोरीच्या घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित चोर कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले आहे. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरांचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असून, रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.