Akola: सोयोबीन खरेदी विक्रीला सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

soyabean seeds.jpg

बार्शीटाकळी : सोयोबीन खरेदी विक्रीला सुरवात

बार्शीटाकळी : कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीटाकळीचे पिंजर उपबाजार येथील उघड लिलाव पद्धतीने सोयाबीनची खरेदी होत असल्यामुळे परिसरातील शेतकरी बंधूंना खूप मोलाचे सुविधा उपलब्ध झालेली आहे.

बाजार समिती द्वारे नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात आलेले आहे. त्यामुळे शेतकरी हित हे प्रथम उद्देश नजरेसमोर ठेवून बाजार समितीचे संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. सोयाबीन सीझनच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा या हेतूने पिंजर उपबाजार येथे उघड लिलाव पद्धतीने शेतमाल विक्रीची पद्धत रुजविण्यात आली. त्यामुळे आज रोजी ८०० ते १२०० क्विंटल सोयाबीन ची आवक बाजार समितीमध्ये होत आहे त्यामुळे बाजार समितीला आलेल्या प्रत्येक शेतकरी समाधान व्यक्त करत आहे.

हेही वाचा: विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज तुरुंगात करणार लग्न

उघड लिलाव पद्धतीमुळे व्यापारी बंधूंना चांगल्या दर्जाच्या मालाला चांगला दर देणे शक्य होते आणि त्या मुळे शेतकरी वर्गांना त्यांच्या चांगला मालाला चांगला भाव मिळण्यास मदत होते. पिंजर उपबाजार येथे ता. ६ ऑक्टोबरपासून सोयाबीनची आवक सुरू झाली. तेव्हापासून शेतकऱ्यांना चार हजार ८०० रुपये क्विंटलपासून पाच हजार ५० रुपये प्रती क्विंटल भाव देण्यासाठी व्यापारी सरसावले आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार पिंजर येथे परिसरातील ६४ खेड्यांचा व्यवहार निगडित आहे. ही बाबलक्षात घेऊन शेतकरी हिताच्या दृष्टीने पींजर उपबाजार चालू करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद असल्यामुळे पिंजर येथील आर्थिक उलाढाल कमालीची वाढलेली आहे. हे एक प्रगतीचे पाऊल आहे.

- सभापती शेंडे

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

बाजार समिती ही शेतकरी हितासाठी तत्पर असून शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल समितीच्या उपबाजार येथे उघड लिलाव पद्धतीने विक्रीसाठी आणून त्यांच्या आर्थिक हित साध्य करावे. तसेच बाजार समिती आवारा बाहेर अनधिकृत व्यापाऱ्यांना आपला शेतमाल विक्री करू नये असे आवाहन समितीद्वारे करण्यात येत आहे. अनाधिकृत व्यापाऱ्यांकडून शेतकरी बंधूंची वजन मापात तफावत करून कंडिशनचे व्यवहार करून शेतकऱ्यांना फसवण्याचे प्रकार घडत आहेत. अशा होणाऱ्या फसवणुकीपासून शेतकऱ्याने सावध असले पाहिजे.

- सचिव, सतिश पाटील शेळके

loading image
go to top