Akola : हिरकणी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

देशमुख महिला मंडळाचा उल्लेखनीय उपक्रम
Akola hirkani festival
Akola hirkani festival esakal
Updated on: 

अकोला : समाजातील महिलांनी इतर महिलांना प्रोत्साहन देऊन, मदतीचा हात देऊन आर्थिक स्वावलंबनाची दिशा दाखवावी. यातून व्यापक प्रमाणात समाजाचा विकास होऊन उद्योग क्षेत्रात महिला सुध्दा पुरुषांच्या बरोबरीने आपले व्यावसायिक कौशल्य सिध्द करू शकतात हे सिध्द होईल, असे उद्योग जागृतीपर आवाहन सुप्रसिद्ध उद्योजिका सौ.वंदना सराग यांनी हिरकणी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

Akola hirkani festival
Akola : उद्धव सेनेच्या मशाल चिन्हाची मिरवणूक

बचत गट व लघूव्यवसायिक महिलांना प्रोत्साहन देऊन त्यांची उत्पादने घराघरात पोहचावित. यातून आर्थिक पाठबळाने महिला व्यवसायात सक्षम होण्यासाठी उद्यमशिलतेला चालना देणाऱ्या हिरकणी महिला बचत गट महोत्सवाचे आयोजन ता.१५ व १६ ऑक्टोबरला करण्यात आले होते. या प्रदर्शनाला अकोला शहर आणि गावागावातून असंख्य महिलांनी भेटी देऊन खरेदीसाठी गर्दी केली.

Akola hirkani festival
Akola : आ.प्रकाश भारसाकळेकडून पूर परिस्थितीची पाहणी

अकोला येथील देशमुख महिला मंडळाने स्थानिक जिल्हा परिषद भवनमध्ये या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यामध्ये दिवाळीतील खाद्य पदार्थ, ज्वेलरी, कपडे, साड्या, सौंदर्य प्रसाधने, गृहउपयोगी वस्तू, सजावटीच्या वस्तू अशा अनेक स्टॉलचा समावेश होता. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सौ.सुहासिनीताई धोत्रे, सौ.मंजुषाताई सावरकर, तर निर्माण मल्टीस्टेटचे उपाध्यक्ष के.जी.देशमुख होते. यावेळी सातारा येथील ज्येष्ठ पत्रकार लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब आंबेकर, लोकस्वातंत्र्यचे संस्थापक व अकोला जिल्हा देशमुख समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष संजय एम.देशमुख, जेसिस क्लब अध्यक्ष अरूणबाप्पू देशमुख, रेखाताई खंडेलवाल, लिनेस क्लब अध्यक्षा सुरेखा गुप्ता, सौ.सुनिता खंडेलवाल, अ.भा.मारवाडी महिला मंडळ अध्यक्षा सौ.कविता टावरी,निर्माणचे श्री गजानन खोटरे,राजेन्द्रजी देशमुख,प्रदिप गुरूखुद्दे,यांची विशेष उपस्थिती होती.

Akola hirkani festival
Akola : गुंठेवारी नियमानुकूल आता ऑफलाइन पद्धतीने

हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी देशमुख महिला मंडळाच्या ज्येष्ठ सल्लागार कविताताई ढोरे, अध्यक्षा सौ राजश्री देशमुख, उपाध्यक्षा सौ. नयना देशमुख, सचिव सौ. स्वप्नाली देशमुख, कोषाध्यक्ष सौ. प्रतिभा देशमुख, सौ.कल्पनाताई, सौ. पुजाताई, सौ. संध्याताई, सौ. सविताताई, सौ. साधनाताई, सौ. पुष्पाताई, सौ. वैशालीताई, सौ. निताताई, सौ. ज्योतीताई, सौ. इंदूताई, सुलभाताई, विद्याताई, संजीवनीताई, सौ. स्वप्ना, श्वेता, मनिषा, पोर्णिमा, शितल, तृप्ती, अश्विनी, अपेक्षा, उज्ज्वला, वैशाली, रोहिणी, ममता, सोनल, योगीनी, स्नेहल, शिल्पा, संगीता, विजयाताई, मंजुषाताई, प्रिती, केतकी, अर्चना, अस्मिता, ऋतुजा, संध्या, प्राची, सुनिता, वैशाली यांनी भरपूर परिश्रम घेतले. सुत्रसंचालन सौ.नयना देशमुख यांनी तर आभारप्रदर्शन सौ.स्वप्नाली देशमुख यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com