Akola: २९ दिवसात बुडाले साडे आठ कोटीचे उत्पन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st

अकोला : २९ दिवसात बुडाले साडे आठ कोटीचे उत्पन्न

अकोला : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेले २९ दिवसांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची कोंडी बुधवारीही कामय होती. या २९ दिवसात अकोला व वाशीम या दोन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या अकोला विभागात एकूण २४ हजार ७६१ फेऱ्या रद्द कराव्या लागल्यात. त्यातून आठ कोटी ४९ लाख ५३ हजार २०३ रुपयांचे एसटीचे उत्पन्न बुडाले आहे.

एसटी मंडळाच्या इतिसाहात प्रथमच एक महिन्यापासून सुरू असलेल्या संपाची कोंडी फुटताना दिसत नाही. सरकार व संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेच्या फेरी सुरू आहेत तर दुसरीकडे न्यायालयीन लढाही सुरू आहे. बुधवारीसुद्धा राज्य पातळीवर मुंबईत बैठकांचे सत्र सुरू होते. अकोला विभागात ता. २७ ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे एसटीची चाके थांबली आहेत. त्याला बुधवार, ता. २४ नोव्हेंबरपर्यंत २९ दिवसांचा कालावधी उलटला आहे.

हेही वाचा: ममतांचे आमंत्रण मोदींनी स्वीकारले

अकोला शहरातील दोन्ही बस स्थानकांसह अकोला विभागात येणाऱ्या अकोला, वाशीम जिल्ह्यातील एकूण आठ बस स्थानकावरून या २९ दिवसात दररोज किमान एक हजार १३१ फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत एकूण २४ हजार ७६१ फेऱ्या रद्द झाल्याने दररोजचे ४० लाख ८० हजार ६५८ रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. आतापर्यंत अकोला विभागातून मिळणाऱ्या एकूण आठ कोटी ४९ लाख ५३ हजार २०३ रुपयांच्या उत्पन्नावर एसटीला पाणी सोडावे लागले आहे.

अकोला विभागात ९० कर्मचारी निलंबित

एसटीच्या संपाची कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने संपकरी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. कामावर येण्याची विनंती करूनही प्रशासनाच्या आदेशाला न जुमानणाऱ्या अकोला व वाशीम जिल्ह्यातील एकूण ९० कर्मचाऱ्यांना आतापर्यंत निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

खासगी वाहतूक जोमात

अकोला शहरातून एसटीच्या फेऱ्या पूर्णतः बंद असल्याने खासगी वाहतूक जोमाने सुरू झाली आहे. सर्व नियम मोडून शासनाने दिलेल्या परवानगीच्या नावावर खासगी वाहतुकदारांकडून प्रवाशांची लुट केली जात आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना एसटीच्या संपाची कोंडी लवकर फुटावी असे वाटत आहे.

विद्यार्थ्यांचे हाल

आठवीपासूनच्या शाळा सुरू झाल्या आहेत. लवकर प्राथमिक व पाचवीपासूनच्या शाळाही सुरू होणार आहेत. महाविद्यालये सुरू झाली आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून विविध शहरातील महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासासाठी एसटी सर्वात सुलभ वाहन होते. मात्र, संपामुळे या विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांना केवळ एसटी नसल्याने महाविद्यालयापर्यंत पोहोचण्यास अडचणीत येत आहे. त्यामुळे एसटीची कोंडी लवकरात लवकर फुटावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

loading image
go to top