मालेगाव : आदिवासी विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यास जिल्हा बँकेचा नकार!

इतर बँकेत खाते उघडण्याचा शाखाधिकाऱ्यांचा सल्ला
आदिवासी विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यास जिल्हा बँकेचा नकार!
आदिवासी विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यास जिल्हा बँकेचा नकार!sakal

मालेगाव : शालेय कामासाठी अत्यावशक असलेले सोमवारी (ता.१८) बँकेचे खाते उघडण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना स्थानिक दी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. आदिवासी विद्यार्थी व पालकांना इतर बँकेत खाते उघडण्याचा सल्लाही शाखा व्यवस्थापकांनी दिला असल्याचा प्रकार घडला आहे.

एससी व एसटी विद्यार्थ्यांना शासनाकडून विविध सवलती दिल्या जातात. त्यानुसार त्यांना बँक खाते असणे आवश्यक आहे. बँक खाते काढण्यासाठी अमानी येथील विठ्ठल झळके मालेगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या शाखेत गेले असता, त्यांना बँकेच्या अधिकाऱ्यांनी खाते काढण्यास टाळाटाळ करून दुसऱ्या बँकेचा रस्ता दाखविला.

आदिवासी विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यास जिल्हा बँकेचा नकार!
अंबाजोगाई : ५,३६४ मीटर पायी चढाई करत सर केला एव्हरेस्टचा बेस कॅम्प

जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ग्रामीण भागातील खातेदारांचा विश्वास आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक याच बँकेला जास्त पसंदी देतात. मात्र, आता बँकेच्या अधिकाऱ्यांकडून खाते काढण्यास टाळाटाळ केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बँकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

यावेळी झळके यांनी बँकेचे व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगीतले की, ते विद्यार्थ्यांचे नवीन बँक खाते काढत नाहीत, तुम्हाला दुसऱ्या बँका नाहीत का? तिथे जा! या आधी हजारो खाते काढले आहेत. मात्र, ते बंद पडले आहेत. त्यामुळे नवीन खाते उघडत नाही असे, सांगून अल्पवयीन मुलाचे पॅनकार्ड काढून आणण्याचा सल्लाही व्यवस्थापकांनी दिला.

९५ टक्के खाती बंदच!

जिल्हा बॅंकेच्या मालेगाव शाखेने साडेचार हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची खाते यापूर्वी उघडली आहेत. त्यापैकी ९५ टक्के खाती बंद पडली आहेत. म्हणून नवीन खाती कशी उघडावी? असा प्रश्न पडतो. आमच्या बॅंकेत मणुष्यबळ कमी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे नवीन खाते उघडणे कठीण आहे. त्यांनी इतर बँकेत खाते उघडावे असे, शाखा व्यवस्थापक जी.डी. तुपसांडे म्हणाले.

आदिवासी विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यास जिल्हा बँकेचा नकार!
रिसोड येथे चोरट्यांचा हैदोस, चार दुकाने फोडली

जिल्हा मध्यवर्ती बँकेसोबत ग्रामीण भागातील नागरिक जुळलेले आहेत. त्यामुळे हे नागरिक या बँकेला जास्त पसंदी देतात. विद्यार्थ्यांचे जॉईंट खाते काढावे लागत असून, विद्यार्थ्यांना शासकीय लाभासाठी बँक खात्याचा उपयोग होणार आहे. मात्र, बँकेच्या अधिकाऱ्यांनी मनमानी सुरू केली आहे. याला आळा बसून ग्रामीण भागातील नगारिकांची हेळसांड थांबवावी.

- अनिल जाधव, सामाजिक कार्यकर्ते.

विद्यार्थ्यांची बँकेत खाते उघडण्यासाठी शासनाने किंवा रिझर्व्ह बँकेने गावे संबंधित बँकांना विभागून द्यावीत तसेच, त्या बँकांना विद्यार्थ्यांची खाते उघडणे बंधनकारक करावे.

- विठ्ठल भागवत, सचिव, म. फुले समता परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com