अंबाजोगाई : ५,३६४ मीटर पायी चढाई करत सर केला एव्हरेस्टचा बेस कॅम्प

अठरावर्षीय ईशा लोहियाचा पराक्रम : १५ दिवस आणि १४ रात्रींची चढाई
एव्हरेस्टचा बेस कॅम्प
एव्हरेस्टचा बेस कॅम्पsakal

अंबाजोगाई : येथील मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांची मुलगी ईशा लोहियाने ५,३६४ मीटर पायी चढाई करत एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर केला. १६ जणांच्या युनिटमध्ये ती सर्वात कमी (वय १८) वयाची एकमेव कॅम्पर मुलगी आहे.

ईशाला दहावीपासूनच ट्रेकिंग करण्याची आवड आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत ती ट्रॅकिंग कॅम्पसाठी जात असे. यापूर्वी तिने मनाली येथील ७ हजार फूट उंचीचा पर्वत सर केले होता. पुणे येथे १२ वी कला शाखेत तिचे शिक्षण पूर्ण झाले असून वेगळा छंद म्हणून तिने ट्रॅकिंगची आवड जोपासली आहे. तिला ट्रॅकिंगचा छंद असल्याने तिने एव्हरेस्टच्या बेस कॅम्प ट्रॅकिंगच्या युनिटमध्ये सहभाग घेतला. सोमवारी (ता. १८) तिने या बेस कॅम्पवर देशाचा तिरंगा फडकावला.

एव्हरेस्टचा बेस कॅम्प
जेल की बेल? आर्यन खान 17 दिवसांपासून अटकेत; आज सुनावणी

१५ दिवस आणि १४ रात्रीच्या या (दक्षिण काठमांडू) कॅम्पसाठी १६ जणांनी सहभाग घेतला होता. त्यात ईशा सर्वात कमी वयाची आहे. समुद्रसपाटी पासून १८५१३ फूट (५३६४) मीटर उंचीवर तिने आपल्या युनिटसह चढाई केली.

आमची लेक जगातील सर्वात ऊंच शिखर सर करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. वयाच्या १८ व्या वर्षी तिची स्वतःची थ्रील अनुभवण्याची इच्छा आणि त्यासाठी तिने केलेली मेहनत याचे हे यश. एव्हरेस्ट शिखरावर देशाचा तिरंगा उराशी बाळगत ती आपले स्वप्न साकार करतेय याचा आम्हाला आनंद आणि अभिमान आहे.

-अनिकेत व कल्पना लोहिया (ईशाचे आई-वडील)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com