अकाेला : चोरट्यांनी सेंट्रल बँकेची तिजोरी फोडली

उकळी बाजार येथील घटना; साडे आठ लाखांवर डल्ला

Akola Thief By Central bank
Akola Thief By Central bank sakal

तेल्हारा : तालुक्यातील उकळी बाजार येथे मंगळवारी (ता.८) रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने सेंट्रल बँकेची तिजोरी फोडल्याचे बुधवारी (ता. ९) सकाळी निदर्शनास आले. तिजोरीतील आठ लाख ६४ हजार ८५० रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या घटनेत तीन आरोपी असल्याचे प्राथमिक तपासातून दिसून येत आहे.

तेल्हारा तालुक्यातील उकळी बाजार येथील सेंट्रल बँकेची शाखा आहे. मंगळवारी (ता. ८) काही अज्ञात चोरट्यांकडून बँकेच्या मागील बाजूतील लाकडी खिडकी तोडून बँकेत प्रवेश करण्यात आला. गॅस कटरच्या सहाय्याने सेंट्रल बँकेची तिजोरी फोडून तिजोरीतील आठ लाख ६४ हजार ८५० रुपयाचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच तेल्हारा पोलिस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.


Akola Thief By Central bank
हिजाब प्रकरण: अशांतता निर्माण होईल असे कृत्य करू नका, गृहमंत्र्याचे आवाहन

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सुद्धा घटनास्थळाला भेट दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी रितू खोकर देखील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले घटनास्थळी उपस्थित होते. अधिक तपासाकरिता श्‍वान पथक, फिंगर प्रिंट तज्ज्ञ, संशोधक यंत्रणांनीही घटनास्थळी बोलविण्यात आले. बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये दोन चोरट्यांचा वावर असल्याचे दिसत असून, या घटनेत दोन पेक्षा अधिक आरोपी असल्याचा संशय प्राथमिक तपासातून दिसून येत आहे. तेल्हारा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात ४६१ व ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, उपविभागीय अधिकारी रितू खोखर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात तेल्हारा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

बँकेची इमारत जीर्ण

ज्या ठिकाणी सेंट्रल बँकची शाखा आहे ती इमारत उकळी बाजार येथील ग्रामपंचायतच्या मालकीची असून तब्बल ५० वर्षापूर्वीची आहे. त्यामुळे बँकेची इमारत पूर्णपणे जीर्ण अवस्थेत आहे. शाखेच्या कार्यालयाचे टीनपत्रे गंजलेले आहेत, जी खिडकी तोडून चोरटे बँकेत शिरले ती खिकडी लागडी असून, कुठलेही हत्यार किंवा साधने न वापरताही खिडकी सहजपणे तोडल्या जाणार अशी तिची अवस्था होती. बँकेच्या मागच्या बाजूला सीसीकॅमेरे नाहीत, बँकेच्या भिंतीपर्यंत झाडे-झुडपी वाढली आहेत.


Akola Thief By Central bank
गडकरींच्या घराबाहेर काँग्रेसचं आंदोलन, भाजप कार्यकर्तेही आक्रमक

आलार्म सिस्टीम बंद

उकळी बाजार येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत कुठलीच आधुनिक सुरक्षा व्यवस्था नसल्याचे दिसून आले. तिजोरीवर आलार्म सिस्टम लावली आहे. परंतु, चोरट्यांनी तिरोजी फोडील त्यावेळी हे आलार्म का वाजले नाहीत? याबाबत संबंधित बँक व्यवस्थापकांना विचारणा केली असता, आलार्म सिस्टम बंद असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. शाखेतील तिजोरीचे आलार्म बंद असल्याने शाखा व्यवस्थापक आपल्या कर्तव्याबाबत किती गंभीर आहेत? हे दिसून येते. तेल्हारा पोलिस प्रशासनाकडून बँकेच्या अंतर्गत व बाहेरील सुरक्षा व्यवस्थेबाबत उपाय-योजना करण्याच्या वेळोवेळी सूचन्या दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com