
इन्शुरन्स कंपनीचे कमिशन मिळण्याचे आमिष दाखवून डॉक्टरांची तब्बल ४१ लाख ८० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी सोमवारी (ता.११) दोन आरोपीना ठाणे येथून अटक केली आहे. त्यामध्ये एका महिलेचा समावेश असून, मुख्य सूत्रधार मोकाटच असून तो शहरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याचे बोलल्या जात आहे.
मंगरूळपीर (जि.अकोला) : इन्शुरन्स कंपनीचे कमिशन मिळण्याचे आमिष दाखवून डॉक्टरांची तब्बल ४१ लाख ८० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी सोमवारी (ता.११) दोन आरोपीना ठाणे येथून अटक केली आहे. त्यामध्ये एका महिलेचा समावेश असून, मुख्य सूत्रधार मोकाटच असून तो शहरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याचे बोलल्या जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी डॉ. विनोद अनंतराव सुरडकर रा. मंगरुळपीर यांनी ता. २६ नोव्हेंबर २०२० रोजी पोलिसांत तक्रार दिली होती की, इन्शुरन्स कंपनीचे कमिशन देण्याचे आमिष दाखवून आरोपी दिव्यप्रकाश इंद्रकुमार शुक्ला उर्फ सुरेंद्र पटेल व स्वाती नाईक उर्फ स्वाती निखिल शिंदे रा. ठाणे यांनी फिर्यादीच्या वेगवेगळ्या इन्शुरन्स पॉलिसी काढल्या.
हेही वाचा - खासदारांच्या गावात स्वाभिमानीच्या शिट्ट्यांनी बसल्या शिवसेनेच्या कानठळ्या
यासाठी फिर्यादीकडून सन २०१५-१६ पासून ऑनलाईन पद्धतीने पैसे घेऊन एकूण ४१ लाख ८० हजार रूपयांनी फसवणूक केली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम भादंवि नुसार गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा तपास पोलिस उपविभागीय अधिकारी यशवंत केडगे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार धनंजय जगदाळे यांचेकडे होता.
तपासात पोलिसांनी सदर आरोपीना ठाणे येथून सोमवारी (ता.११) अटक केली असून, मंगळवारी (ता.१२) आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सोमवार (ता.१८) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींची कसून चौकशी करून यांनी अजून किती लोकांना गंडा घातला याची सुद्धा चौकशी करण्यात येणार आहे.
हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
आरोपींना ठाणे येथून अटक करण्यासाठी एपीआय निलेश शेंबडे, पीएसआय सुष्मा परांडे, नापोकॉ अमोल मुंदे, सुनील गंडाईत, मोहम्मद परसुवाले यांनी सदरची कामगीरी केली तर, सायबर सेलचे एपीआय खंदारे व त्यांच्या चमूने यासाठी सहकार्य केले.
सदर गुन्हा हा पैशाच्या देवाणघेवाणचा असल्याने यामध्ये कागदोपत्री बारकाईने निरीक्षण करून व सद्या आरोपींची चौकशी करून पुरावे गोळा करणे गरजेचे आहे. त्यामुळे आताच काही सांगू शकत नाही.
-यशवंत केडगे, पोलिस उपविभागीय अधिकारी, मंगरुळपीर.
हेही वाचा - शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीचे 25 कोटी रुपये! निधी तहसीलदारांच्या खात्यात जमा
अनेकांना गंडविल्याची शक्यता
या प्रकरणामधे डाॅक्टरला लाखो रूपयाचा गंडा घालणाऱ्या टोळीने संपूर्ण राज्यभर अनेकांना कोट्यावधींचा गंडा घातला असल्याची चर्चा आहे. या प्रकरणात तपास पारदर्शक झाला तर अनेक बडे मासे गळाला लागू शकतात.
(संपादन - विवेक मेतकर)