‘पाचवी ते आठवी’चे वर्ग सुरू होणार, पालकात अजूनही संभ्रम

Akola Washim Marathi News- Fifth to Eighth classes will start, there is still confusion among parents
Akola Washim Marathi News- Fifth to Eighth classes will start, there is still confusion among parents

शिरपूर जैन (जि.वाशीम) : शासनाकडून २७ जानेवारी पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र, याबाबत मोठ्या प्रमाणात काळजी घेणे गरजेचे असून, निर्णयामुळे पालकात संभ्रम आहे.

कोरोना संसर्ग कमी झाला तो अद्याप संपला नाही. त्यामुळे बालकांच्या आरोग्याचा विचार करूनच शाळा सुरू व्हाव्यात, अशी मागणी पालक करीत आहेत.


नववी ते बारावीचे वर्ग गत काही महिन्यापासून सुरू झालेत. मात्र, विद्यार्थ्यांची उपस्थिती दहा ते वीस टक्केच असल्याने आपले पाल्य शाळेत पाठविण्याबाबत पालक उदासीन आहेत. वर्ष वाया गेले तरी चालेल पण मुलांच्या आरोग्याबाबत तडजोड करण्यास कुठलेही पालक तयार नाहीत.

अनेक पालकांच्या मते विद्यार्थी शाळेत गेला की, त्याची जबाबदारी शाळेचीच असावी. आता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्यास शासनाकडून हिरवी झेंडी मिळाली आहे. मात्र, अद्याप कोरोना संसर्गाचे सत्र संपलेले नसून, ते धीम्या गतीने सुरूच आहे तसेच जानेवारी संपत आला, शैक्षणिक सत्र देखील अंतिम टप्प्यात आहे.

पाल्याला शाळेत पाठवून पालक मुलाबाबत कुठलीही जोखीम स्वीकारण्यास तयार नसल्याचे दिसते. पूर्वी सुरू केलेल्या वर्गातच विद्यार्थ्यांची उपस्थिती अगदीच नगण्य आहे. त्यात आता ही लहान मुले शाळेत पाठवण्याचा शासनाचा अट्टाहास पाहता पालकात आलेली संभ्रमावस्था त्यामुळे पालकांची संमती त्यास कितपत राहील? हे पाहणे औच्युक्याचे ठरणार आहे. लहानग्या मुलांना शाळेत पाठवने त्यातही स्थानिक शालेय प्रशासन, पालकांचे संमतीपत्र आदी अटी लागणारच आहेत.

तेव्हा मोठ्या विद्यार्थ्यांनाच पालक शाळेत पाठविण्यात मागेपुढे पाहत असताना, आता ही लहानगे मुले पालक शाळेत पाठवतील का? हा देखील मोठा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यात आता शैक्षणिक सत्र अंतिम टप्प्यात आहे,

तेव्हा एक ते दीड महिन्यासाठी आपल्या मुलांना शाळेत पाठवावे लागेल. ही लहान मुले सोशल डिस्टंन्सिंग, मास्क, हात धुणे आदी नियम पाळतील का? शाळेत जाणारे विद्यार्थी तेथे शिक्षण घेतील तर, घरी राहणारे विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेतील. तेव्हा शासनाचा हा प्रयोग आता कितपत यशस्वी ठरतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com