मंत्र्याचे शक्तिप्रदर्शन अन् पोलिसांचा कोंडमारा

akola washim news corona sanjay rathod poharadevi banjara pooha chavhan
akola washim news corona sanjay rathod poharadevi banjara pooha chavhan

वाशीम/ अकोला :  टिकटाॅक स्टार पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड संशयाच्या घेऱ्यात अडकले आहेत. मात्र मंगळवारी (ता.२३) पोहरादेवीत मंत्र्याच्या शक्तिप्रदर्शनात झालेला गोंधळ व पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे यामध्ये दोनही बाजूने पोलिस प्रशासनाची गत अडकित्त्यातील सुपारीगत झाली आहे.

खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप गोरबंजारा ब्रिगेडने केला आहे, तर जमावाची पोलिसावरची दगडफेक व कोरोना कायद्याचे उल्लंघन याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतल्याने पोलिस प्रशासनाची पंचाईत झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा - कोरोनाचा विस्फोट; एकाच रात्रीत अवघे गाव झाले हॉटस्पॉट
पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते. या आरोपाचे खंडन करण्यासाठी संजय राठोड यांनी समस्त देशातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीची निवड केली. मंगळवारी संजय राठोड हे पोहरादेवीत दाखल होण्याआधीच संजय राठोड यांच्या समर्थकांची रीघ पोहरादेवीत सुरू झाली होती.

हेही वाचा - 

आधीच कोरोनाचा कहर त्यात जमावबंदीचा आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केल्यानंतर पोलिसांनी सबंधितांना नोटीस बजावल्या होत्या. पोहरादेवी येथील महंत यांनीही गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. मात्र, मंत्री समर्थकांनी आवाहन न जुमानता गर्दी केलीच. पोलिसांनी गर्दीला आवर घालण्याचा अटोकाट प्रयत्न केला मात्र, जमावातून दगडफेक सुरू झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करण्याचा प्रयत्न केला.

तरीही समर्थकांची गर्दी कोरोना कायद्याला वाकूल्या दाखवून गेली. खुद्द जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांना गर्दीत घुसून आवर घालावा लागला. याचे पडसाद मुंबई पर्यंत उमटले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दीबाबत नाराजी व्यक्त करीत कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांची इथे पुन्हा पंचाईत झाली. वनमंत्र्याच्या शक्तिप्रदर्शनात गुन्हे कोणावर दाखल करावे ? हा प्रश्न निर्माण झाला, तर जमावाला चेहरा नसल्याने अंदाजे दहा हजार लोकांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
----------------------------


कोरोनाचे गांभीर्य मंत्र्यांना का कळले नाही?
सध्या संपूर्ण राज्यभर कोरोनाची दुसरी पायरी धुमाकुळ घालत आहे. वनमंत्री संजय राठोड यांनी चार दिवसापूर्वीच पोहरादेवीत येणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे गर्दी होणार हे मंत्र्यानाही अपेक्षित असणार मात्र, या कठीण काळात त्यांनी इतरत्र प्रसार माध्यमांशी संवाद साधून पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आपली बाजू मांडणे सहज शक्य होते. मात्र, त्यांनी तसे न करता पोहरागडाच्या पवित्र जागेचीच निवड का? केली हे अनाकलनीय आहे.
---------------------------


चोर सोडून सन्याशाला फाशी ः गोर बंजारा ब्रिगेड
पुजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने दहा ते पंधरा दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघाले. यानंतर वनमंत्री पोहरादेवी येथे दर्शनासाठी आले असता, आठ ते दहा हजार लोकांची गर्दी जमल्याने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी उपस्थीत असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला मिळाले. त्यानुसार पोलिस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून दहा प्रमुख व्यक्तींसह सुमारे आठ ते दहा जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु, मागील महिन्यांपासून पोहरादेवी व परिसराच्या बाहेर असणारे पुरोगामी विचाराचा प्रचार व प्रसार करणारे रमेश बापू महाराज (रमेश तुकाराम राठोड) यांच्यावर जाणिवपूर्वक सूडबुद्धीने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकार चोर सोडून संन्याशाला फाशी असाच प्रकार असल्याचे दिसून येेते. असा आरोप गोर बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांनी केला आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com