अरे हे काय? सम्राट अशोककालीन स्तुप दडलाय या मातीत, अनमोल ठेवा जमिनीखाली मात्र उत्खननाला निधीच नाही

राम चौधरी 
Wednesday, 12 August 2020

या शहराच्या भुगर्भात अनेक गुपीते दडली असून, अलीकडे झालेल्या चाचणी उत्खननात सम्राट अशोकालीन बौध्द संस्कृतीचे अवशेष सापडले होते. मात्र पुढील उत्खननाला निधीची उपलब्धता नसल्याने हा अनमोल ठेवा जमिनीखाली उपेक्षेचे उसासे देत आहे.

वाशीम  ः पौराणिक काळापासून वाशीम किंवा तत्कालीन वत्सगुल्म शहर विदर्भातील महत्त्वाचे शहर राहिले आहे. या शहराला कधीकाळी दक्षिणेचे प्रवेशद्वार म्हटले जायचे.

या शहराच्या भुगर्भात अनेक गुपीते दडली असून, अलीकडे झालेल्या चाचणी उत्खननात सम्राट अशोकालीन बौध्द संस्कृतीचे अवशेष सापडले होते. मात्र पुढील उत्खननाला निधीची उपलब्धता नसल्याने हा अनमोल ठेवा जमिनीखाली उपेक्षेचे उसासे देत आहे.

प्राचीन वाशीम किंवा वत्सगुल्म नगर कला व संस्कृती यांचे केंद्र होते. येथे काही वर्षे राष्ट्रकूट व नंतर यादव (१२१०-१३१८) घराण्यांची सत्ता होती. मोगल काळात (१५३०-१७५७) ते हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारित होते. पुढे मराठे, पेशवे आदी सत्तांनी हा भाग ताब्यात ठेवला.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

वाकाटक नृपती दुसरा विंध्यशक्ती याचा ताम्रपट १९३९ साली सापडल्यानंतर वाशीम पुन्हा प्रकाशझोतात आले. हा ताम्रपट ‘वत्सगुल्मʼ येथून राजाच्या ३७ व्या राज्यवर्धापनवर्षी देण्यात आला होता.

exampleसावधान! पुढील दोन दिवसांत या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

सावधान! पुढील दोन दिवसांत या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

वत्सगुल्म म्हणजेच वाशीम ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाकाटकांच्या पश्चिम शाखेची राजधानी होती. या पार्श्वभूमीवर १९९२-९३ व १९९४-९५ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये विभाग, नागपूर यांच्यातर्फे येथे गवेषण, उत्खनन करण्यात आले.

हे उत्खनन फुकतपुरा येथील चामुंडेश्वरी मंदिरासमोर श्री. इंगळे यांच्या शेतात आणि जैन क्षेत्रपालाचे आधुनिक देऊळ असलेल्या ‘लाला देऊळʼ अशा दोन ठिकाणी करण्यात आले.

अरे देवा! वडीलांसाठी जेवणाचा डबा घेऊन गेला अन् डॉक्टरांनी दिले डेथ सर्टीफिकेट

अरे देवा! वडीलांसाठी जेवणाचा डबा घेऊन गेला अन् डॉक्टरांनी दिले डेथ सर्टीफिकेटCaption

श्री. इंगळे यांच्या शेतात केलेल्या उत्खननात १४ बाय १२ मी. मापाचे अंडाकृती बांधकाम सापडले. या बांधकामासाठी भट्टीत भाजलेल्या विटा वापरल्या होत्या. या बांधकामाच्या केंद्रस्थानी विटांनी बांधलेला चौरस असून, मध्यभागी एक अष्टकोनी खळगा आहे. प्रत्येक कोपऱ्यात तारकाकार साधण्यासाठी इंग्रजी ‘एलʼ आकाराच्या भाजक्या विटांचा वापर केलेला दिसतो.

समोर मंडपाचा चौथरा आहे. याशिवाय खापरे, मणी, मातीच्या मूर्ती व इतर वस्तू, लोखंडी वस्तू तसेच वाकाटक व क्षत्रप घराण्यांची नाणी सापडली. याच ठिकाणी शेतात उमा-महेश्वराची व शंखनिधीची प्रतिमा आढळली.

example

नोकरी हवी तर धावा, पळा, चला भरा अर्ज, महावितरणमध्ये निघाल्या तब्बल सात हजार जागा

१९९४-९५ मध्ये लाला देऊळ या ठिकाणी उत्खनन करण्यात आले. हे उत्खनन ८० बाय ८० मी.हून थोडे अधिकच मोठे होते. या उत्खननात १ मी. जाडीची परकोटाची भिंत सापडली. ती सुमारे ७० मी. पूर्वपश्चिम धावत होती.

या भिंतीला लागून इतरही काही बांधीव अवशेष सापडले. त्यांपैकी एक बांधकाम अंडाकार असून, त्याच्या केंद्रभागातील अष्टकोनी बांधकाम वगळता ते पहिल्या उत्खननात मिळालेल्या बांधकामाशी तंतोतंत मिळतेजुळते होते. या टेकाडाच्या नैऋत्येस एका साध्या तारकाकृती पायावर बेतलेले अंडाकार बांधकाम सापडले. त्यांचे अजिंठा येथील भित्तिचित्रांत आढळणाऱ्या खांबांशी साधर्म्य आहे.
 
टॉवरसाठीच्या खोदकामात सापडल्या होत्या मूर्ती
शिवाजी महाराज चौक ते पाटणी चौक रस्त्यावर एका मोबाईल कंपनीचे टाॅवरसाठी खोदकाम करीत असताना काही मूर्ती सापडल्या होत्या. मात्र कंपनीने ही बाब लपवून ठेवून मूर्तींची विल्हेवाट लावली. ही बाब काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी मोबाईल टाॅवरचे काम बंद पाडले होते. यानंतर भारतीय पुरातत्व विभागाने येथे २००५ मधे चाचणी उत्खनन केले. या उत्खननात उत्तर- दक्षिण अशी सव्वा मीटर रुंदीची भिंत आढळून आली होती.
 
बौद्ध स्तुपाशी साधर्म्‍य असल्याचा इतिहासतज्ज्ञांचा दावा
बांधकाम कोणत्या काळातील याबाबत तर्कवितर्क लावले जात असताना प्रख्यात इतिहासतज्ज्ञ डाॅ. वि. भी. कोलते यांनी सदर भिंत ही सम्राट अशोक कालीन बौध्द स्तुपाच्या परकोटाची संरक्षक भिंत असल्याचा तर्क काढला होता. दगडाची ठेवण व घडण ही इतर ठिकाणी असलेल्या बौध्द स्तुपाच्या भिंतीशी साधर्म्य असल्याचे निवेदनही त्यांनी प्रसिद्ध केले होते.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Washim News Emperor Ashokas stupa is hidden in this soil, keep it precious but there is no fund for excavation under the ground