Akola News : ‘ऑक्टोबर हिट’ने अकोलेकर त्रस्त; पारा ३६.९ अंशांवर; गुलाबी थंडीसाठी दोन आठवडे प्रतीक्षाच

अकोला जिल्हा व परिसरातून मात्र पाऊस आठवडाभरापूर्वीच गायब झाला
akola weather update heat 36 degrees Two weeks wait for cold weather
akola weather update heat 36 degrees Two weeks wait for cold weatherSakal

अकोला : पावसाने काढता पाय घेताच जिल्ह्यात सूर्याची प्रखरता वाढली आहे. उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला असून, पारा ३६.९ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे अकोलेकरांना ‘ऑक्टोबर हिट’चा सामना करावा लागत आहे.

मॉन्सून अधिकृतरीत्या १० ऑक्टोबरनंतर राज्यातून परतण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अकोला जिल्हा व परिसरातून मात्र पाऊस आठवडाभरापूर्वीच गायब झाला आहे. जिल्ह्यात परतीचा पाऊस फारसा झाला नाही.

त्यापूर्वी पावसाचा फारसा जोर नसल्याने २८ टक्के पावसाची तूट आहे. पाऊस गायब झाल्याने आता हवामान बहुतांश कोरडे झाले आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. गेले आठवडाभरापासून पारा सातत्याने ३५ अंशांच्यावर आहे. परिणामी अकोलेकरांना ‘ऑक्टोबर हिट’ने त्रस्त केले आहे. रविवारी (ता.८) अकोला शहराचा पारा ३६.९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता.

असह्य उकाडा

कोरड्या व उष्ण हवेचे प्रमाण वाढल्याने बाष्पोत्सर्जनात वाढ झाली आहे. परिणामी अकोला शहर व जिल्ह्यात असह्य उकाडा जाणवत आहे. घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. आगामी काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. हवामानदेखील कोरडे राहणार असल्याने नवरात्रोत्सवापर्यंत अकोलेकरांना ‘ऑक्टोबर हिट’चा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

...तरच ऑक्टोबर अखेर थंडी

बंगालच्या उपसागरात आगामी काही आठवड्यांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. मात्र, जर क्षेत्र कमी तीव्र राहिले तर पाऊस येणार नाही. त्यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे ऑक्टोबर अखेरपर्यंत महाराष्ट्राकडे येऊन थंडीचा जोर वाढू शकतो. तोपर्यंत गुलाबी थंडीची अकोलेकरांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com