एटीएममधून पैसे काढताय; थोडं थांबा! हा निष्काळजीपणा पडू शकतो महागात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा अगदी घट्ट होत आहे. यामध्ये लहानशी चुकीसुद्धा मोठ्या विघातक संकटाला कारणीभूत ठरणारी आहे. अशातच निष्काळजीपणे एटीएममधून पैसे काढणेही महागात पडू शकते.

अकोला :  जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा अगदी घट्ट होत आहे. यामध्ये लहानशी चुकीसुद्धा मोठ्या विघातक संकटाला कारणीभूत ठरणारी आहे. अशातच निष्काळजीपणे एटीएममधून पैसे काढणेही महागात पडू शकते.

कारण, एटीएमचे गेट उघडण्यापासून ते पैसे काढेपर्यंत अनेक वस्तूंना स्पर्श होतो. दुसरीकडे आरोग्य विभागाच्या माहितीनुसार कोरोना वायरस प्लास्टिकवर ७२ तर स्टीलवर ४८ तास जिवंत राहतो. एटीएमध्ये सॅनिटायझरही नसल्याने धोका वाढू लागल्यामुळे बँकांनी याला गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

हेही वाचा - अकोल्यात कोरोनामुक्तीसाठी ‘मी सक्षम’

बँकांमध्ये दररोज विविध कामांसाठी हजारोंच्या संख्येने नागरिक येत असतात. अनेक बँकांचे एटीएम सुद्धा त्यांच्या बाजूलाच असतात. दरम्यान, जिल्ह्यातील मुख्य आणि इतर बाजारपेठाच्या गावांमध्ये शेकडोच्या संख्येने एटीएम आहेत. आता सर्वच व्यवहार ऑनलाइन झाल्यामुळे अनेकजण दररोज एटीएममधून पैसे काढण्यासाठी येत असतात. एटीएममध्ये गेट उघडण्यापासून ते मशीनची प्लास्टिक बटण दाबण्यापर्यंत प्रत्येक नागरिकांचा स्पर्श होतो. यामुळे एटीएममध्ये सॅनिटायझर ठेवणे काळाची गरज आहे.

हेही वाचा - कोरोनाच्या सावटातही या पक्षाने जाहीर केली जम्बो जिल्हा कार्यकारिणी

मागील काही दिवसांपासून पॉझिटिव्ह संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे धोकादायक स्थितीकडे अकोला वाटचाल करू लागला आहे. यामुळे आता जेवढी सावधानता, सतर्कता बाळगली तेवढा आपला बचाव होणार आहे. तेव्हा शहरातील एटीएममध्ये याबाबत सुरक्षा आणि निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे.

या स्टेप्स करा फाॅलो
-एटीएममध्ये जाण्याआधी तोंडाला मास्क किंवा हात रुमाल बांधा
-दार ढकलण्या आधी हाताला सॅनिटायझर लावा
-शक्य असल्यास हातात हात मोजे घाला
- एटीएम स्कॅन करून पैसे काढा

थोडे इथे थांबा
आपण एटीएममधून पैसे काढल्यानंतर एटीएम पाकिटामध्ये ठेवण्याआधी ते निर्जंतुकीकरण करून घ्या. नंतरच ते पाकीटात ठेवा. पैसे मोजून एखाद्या पिशवित ठेवा आणि नंतरच खिशात ठेवा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Withdraw money from ATMs; Wait a minute! This negligence can be costly