अकोला : युथ काँग्रेसच्या निवडणुकीची अकोला जिल्ह्यात धामधुम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akola

युथ काँग्रेसच्या निवडणुकीची अकोला जिल्ह्यात धामधूम

अकोला : युथ काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीची धामधुम सध्या सुरू आहे. त्यासाठी राज्याध्यक्षापासून ते विधानसभानिहाय पदाधिकारी निवडले जाणार आहे. अकोला जिल्ह्यातूनही युवक काँग्रेसच्या इच्छुकांनी या संघटनात्मक निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. सदस्य नोंदणी व नोंदणी झालेल्या सदस्यांकडून मतदान करून घेण्याचा उपक्रम सध्या जोमाने सुरू आहे. त्यासाठी महानगरासाठी इच्छुकांकडून वार्ड तर ग्रामीणसाठी जिल्ह्यातील पदाधिकारी गावपातळीवर पोहोचून सदस्य नोंदणी करून घेण्यात व्यस्त झाले आहे.

एकीकडे जिल्हा परिषद पदाधिकारी, विधान परिषद निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता जिल्ह्यातील १९८ ग्रामपंचायतच्या ३९८ रिक्त जागासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या तापलेल्या राजकीय वातावरणातच अकोला जिल्ह्यात युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीच्या निमित्ताने युवकांमधील राजकीय चढाओढ बघावयास मिळत आहे. येत्या ता. १२ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यासह राज्य स्तरापर्यंत सदस्य नोंदणी व मतदारांचा कार्यक्रम चालणार आहे.

हेही वाचा: अकोला : कोरोना लसीकरणासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती

प्रदेश स्तरावर तिघांमध्ये स्पर्धा

अकोला जिल्ह्यातील महासचिव पदासाठी अकोला जिल्ह्यातील युवक काँग्रेसच्या तीन सदस्यांनी अर्ज केला आहे. त्यात कपिल ढोके, विद्यमान प्रदेश महासचिव सागर कावरे आणि अब्दुल्ला यांचा समावेश आहे. राज्यभरातून २०६ सदस्या महासचिव पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतले आहेत.

ग्रामीपेक्षा शहरात चुरस अधिक

युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीच्या निमित्ताने युवकांमधील राजकीय कसब पणाला लागत आहे. अकोला जिल्ह्यात ग्रामीणमध्ये तीनच पदाधिकारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. त्यातुलनेत अकोला महानगराध्यक्ष पदासाठी सहा सदस्यांमध्ये चुरस दिसून येत आहे. त्यात आकाश कवडे, फैजल खान, आशीष पांडे, कीर्ती देशमुख, अक्षय देशमुख, राहुल सारवान आदींचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये गोलुसेठ उर्फ अलतामश मो. सलीम परवेज हा हिदायत पटेल गटाचा उमेदवार, संजय बोडखे गटाचा निनाद मानकर तर ॲड. महेश गणगणे गटाचे मिलिंद नितोने यांच्यात स्पर्धा आहे.

हेही वाचा: बेळगाव : ‘सकाळ’ बातमीची खासदारांकडून दखल ; सुसज्य रुग्णालय उभारा अशी मागणी

अशी आहे उमेदवारांची संख्या

अकोला पूर्व : १४

अकोला पश्चिम : ०५

अकोट : ०३

बाळापूर : ०५

मूर्तिजापूर : ०२

loading image
go to top