बेळगाव : ‘सकाळ’ बातमीची खासदारांकडून दखल ; सुसज्य रुग्णालय उभारा अशी मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

paschim maharashtra

बेळगाव : ‘सकाळ’ बातमीची खासदारांकडून दखल ; सुसज्य रुग्णालय उभारा अशी मागणी

sakal_logo
By
सतीश जाधव

बेळगाव : उद्यमबाग येथील औद्योगिक वसाहतीच्या कामगारांचा विचार करून ‘सकाळ’ने उद्यमबाग वसाहतीत ईएसआयचे सुसज्य रुग्णालय उभारा अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत उद्योजकांनी खासदार मंगल अंगडी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात उद्यमबाग येथे विभागीय रुग्णालय उभे राहण्यासाठी पाठपूरावा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. याला खासदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

‘सकाळ’च्या १३ नोव्हेंबरच्या अंकात ‘हजारो कामगार; हवा ‘ईएसआयसी’चा आधार’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. याची दखल म्हणून उद्योजकांनी खासदारांकडे ही मागणी केली आहे. याला खासदारांनी देखील हिरवा कंदील दिला आहे. गेल्या अनेक वर्षापासून ईएसआयचे मुख्य रुग्णालय अशोकनगर येथे आहे. तसेच मुख्य ईएसआय रुग्णालयाबरोबर चन्नम्मा सर्कल, शहापूर, यमनापूर (इंडाल), उद्यमबाग व पिरनवाडी येथे डिस्पेन्सरी आहेत. तसेच नेहरुनगर केएलई, येळ्ळूर रोड केएलई, विजया ऑर्थो, श्री ऑर्थो, कॉलेज रोड रुग्णालय व बेळगाव चिल्ड्रन रुग्णालय या ठिकाणी असलेल्या खासगी रुग्णालयातही ईएसआयसीतर्फे उपचार केले जातात. मात्र, उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत विभागीय कार्यालय उभारा अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा: देशाची बदनामी करण्यात राऊत आघाडीवर : चंद्रकांत पाटील

तात्कालिन मंत्री मल्लिकार्जून खर्गे यांनी गुलबर्ग्यांची कामगार संख्या कमी असतानाही गुलबर्गा येथे इएसआयचे उप विभागीय कार्यालय मंजुर करून घेतले. याप्रमाणे उद्यमबाग येथेही कार्यालय सुरु करावे अशी मागणी केली जात आहे. बेळगाव जिल्ह्यातून सुमारे १ लाख २० हजार कामगारांची नोंद ईएसआयसीकडे आहे. यामुळे प्रत्येक भागात असलेल्या ईएसआयसी डिस्पेन्सरीत तसेच अशोकनगर येथील मुख्य रुग्णालयात नेहमी गर्दी असते. यामुळे उद्यमबागमध्ये विभागीय कार्यालय सुरु करा अशी मागणी करण्यात आली.

हेही वाचा: राजधानी दिल्ली : मौनम्‌ सर्वार्थ साधनम्‌ !

दिल्ली येथील ईएसआय कार्पोरेशन अधिकाऱ्यांची अपॉयमेंट घ्या. आम्ही तुमच्यासोबत येतो. अशी मागणी खासदारांकडे करण्यात आली. यावर खासदारांनी दिल्लीतील अधिकाऱ्यांशी भेटून यावर तोडगा काढू. तुम्ही तुमच्या अडचणी त्या अधिकाऱ्यांकडे मांडा. लवकरच ईएसआयच्या अधिकाऱ्याची अपॉयमेंट घेऊन तुम्हाला सांगितले जाईल. असेही खासदार म्हणाल्या. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रोहन जुवळी, हेमेंद्र पोरवाल, सचिन सबनीस, स्वप्नील शहा आदी उपस्थित होते.

loading image
go to top