आंबेडकरांची नाराजी भोवली; जिल्हा परिषद अध्यक्षांचा राजीनामा

आंबेडकरांची नाराजी भोवली; जिल्हा परिषद अध्यक्षांचा राजीनामा
Updated on: 

अकोला : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतीभा भोजने यांना राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांकडे दिला आहे. ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत अनेक दिवसांपासून नाराज होते. त्यामुळे पक्ष संघटनेने प्रतीभा भोजने यांना अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते. बाळासाहेब निर्णय घेईपर्यंत भोजने या अध्यक्षपदी कायम राहतील. (Akola Zilla Parishad President Pratibha Bhojne resigns)

आंबेडकरांची नाराजी भोवली; जिल्हा परिषद अध्यक्षांचा राजीनामा
जिल्हा परिषद निवडणुकांबाबत अनिश्‍चितता


अकोला जिल्हा परिषदेवर वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे. गतवर्षी झालेल्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेचा कारभार वंचित बहुजन आघाडीने महिला पदाधिकारी प्रतीभा भोजने यांच्याकडे सोपविला होता. काही महिन्यातच त्यांच्या कारभाराबाबत वंचित बहुजन आघाडीतील पदाधिकाऱ्यांकडून नाराजीचा सूर उमटू लागला होता. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची तीन सदस्यीय सुकानू समिती गठीत करून जिल्हा परिषदेचा कारभार चालविला जात होता.

आंबेडकरांची नाराजी भोवली; जिल्हा परिषद अध्यक्षांचा राजीनामा
कोरोनामुळे अनाथ ७०० विद्यार्थ्यांची जबाबदारी बीजेएसने स्वीकारली

पदावर असूनही जिल्हा परिषद अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र पक्षाने दिले नव्हते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्येही धुसफूस सुरूच होती. अखेर गुरुवारी घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर पक्ष संघटनेच्या आदेशानुसार प्रतीभा भोजने यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

आंबेडकरांची नाराजी भोवली; जिल्हा परिषद अध्यक्षांचा राजीनामा
सेवा सहकारी सोसायटीकडून ४१ कोटींचे पीक कर्ज वाटप

आता त्यांच्या राजीनाम्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर अंतिम निर्णय घेणार आहेत. यासंदर्भात जि.प. अध्यक्षांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी राजीनाम्याच्या विषयावर भाष्य करण्याचे टाळले.

वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष संघटनेने जिल्हा परिषद अध्यक्षांचा राजीनामा मागितला होता. पक्ष संघटनेच्या निर्णयाला मान देवून जि.प. अध्यक्ष प्रतीभा भोजने यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यावर अंतिम निर्णय बाळासाहेब आंबेडकर घेतील.
-डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.

संपादन - विवेक मेतकर


Akola Zilla Parishad President Pratibha Bhojne resigns

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com