अकोट; शटर बंद, विक्री सुरू

अकोट; शटर बंद, विक्री सुरू
अकोट; शटर बंद, विक्री सुरू

अकोट (जि.अकोला) ः वेळेच्या मर्यादेनंतरही दुकानाचे शटर बंद करून आतून विक्री सुरूच ठेवणाऱ्या शहरातील नऊ दुकानदारांवर पालिका, महसूल, पोलिसांच्या संयुक्त पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे. शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत १४ हजार दंड वसूल करण्यात आला. Akot; Shutter closed, sale resumes

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. शिवाय रमजान ईद तोंडावर असल्याने खरेदीसाठी ग्राहक बाजारात येत आहेत. काही दुकानदार शटर बंद ठेवून आतून विक्री व्यवहार सुरू ठेवत आहेत. याची माहिती मिळताच,संयुक्त पथकाकडून कारवाई करण्यात आली. यामध्ये ९ व्यापाऱ्यांना दंड करण्यात आला आहे. ही कारवाई अधिक कडक केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

प्रशासनाकडून जनतेला व विक्रेत्यांना वारंवार आवाहन करण्यात येऊनही छुप्या पध्दतीने व्यवहार सुरू आहेत. यामुळे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे तत्काळ व्यापाऱ्यांनी अशी विक्री थांबवावी. नागरीकांनीही अनावश्यक घराबाहेर पडू नये. अन्यथा शहरात आणखी कठोर निर्बंध लावावे लागतील, असे उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले आहे.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com