Akola News : जुनी पेन्शन व विद्यार्थी, शिक्षकांच्या मागण्यांसाठी धडकणार आक्राेश माेर्चा

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार
akrosh morcha for old pension scheme student and teaches demand akola marathi news
akrosh morcha for old pension scheme student and teaches demand akola marathi newsesakal

Akola News: जुनी पेन्शन, विद्यार्थी, शिक्षक व शैक्षणिक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीकडून ११ डिसेंबर रोजी नागपूर येथील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

विद्यार्थी व शिक्षक हिताच्या विविध मागण्या असून शिक्षकांवर अनेक प्रकारची अशैक्षणिक कामे लादली जात आहेत . त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षकांना फक्त शिकविण्याचेच काम करू द्या व १ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ जुनी पेन्शन योजना लागू करा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीच्या शिक्षकांचा महाआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

akrosh morcha for old pension scheme student and teaches demand akola marathi news
Akola News : जि.प. पोटनिवडणूक; सहाही उमेदवारांचे अर्ज वैध

राज्य शिक्षकांचा महामोर्चा राज्य नेते उदय शिंदे , राज्याध्यक्ष विजय कोंबे , राज्य सरचिटणीस राजन कोरेगावकर यांच्या नेतृत्वात काढण्यात येणार आहे.शिक्षकांनी माेठ्या संख्येने माेर्चात सहभागी हाेण्याचे अावाहन शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख,

सरचिटणीस प्रशांत अकोत , मारोती वरोकार, विभागीय उपाध्यक्ष गोपाल सुरे , विजय टोहरे, संजय इंगळे, अनिल पिंपळे, किशोर कोल्हे, मंगेश देशपांडे आदींनी केल्याचे प्रसिद्धी प्रमुख दिनेश बोधनकर यांनी कळविले आहे.

akrosh morcha for old pension scheme student and teaches demand akola marathi news
Akola Crime: रस्त्यावर केक कापण्यापासून रोखलं म्हणून तरुणांचा नागरिकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला ! एकाला अटक

या मागण्यांसाठी निघणार माेर्चा

  • शिक्षकांना शिकवू द्या विद्यार्थ्यांना शिकू द्या , राज्यात जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करा.

  • कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नका.

  • गावात निवासस्थान उपलब्ध करून देईपर्यंत मुख्यालय निवासाची सक्ती करण्यात येऊ नये.

  • घरभाडे भत्ता बंद करू नये.

  • दत्तक शाळा योजना रद्द करण्यात यावी.

  • जिल्हा परिषद शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाची थकबाकी तत्काळ अदा करावी.

  • नगर परिषद व मनपा शिक्षकांची सहाव्या व सातव्या वेतन आयोगाची थकबाकी तत्काळ अदा करावी.

  • वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक व अन्य प्रकारची थकबाकी तत्काळ अदा करावी.

  • शिक्षकांची भरती करून अशैक्षणिक कामाचा बाेझा कमी कमी करण्यात यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com