esakal | प्राणीजन्य आजारांचा आवळतोय विळखा; विषाणुजन्य आजारांचे आक्रमण अधीक
sakal

बोलून बातमी शोधा

प्राणीजन्य आजारांचा आवळतोय विळखा; विषाणुजन्य आजारांचे आक्रमण अधीक

प्राणीजन्य आजारांचा आवळतोय विळखा; विषाणुजन्य आजारांचे आक्रमण अधीक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अनुप ताले
अकोला ः निसर्गसाखळीतील अविभाज्य घटक असलेले पशू, पक्षी मानवी जिवनातही मोलाचा भाग आहेत. अर्थार्जनासोबतच विविध गरजा पशू, पक्षांच्या मदतीने मणुष्य पूर्ण करत आला आहे. मात्र, आता पशू, पक्षांपासून निर्मित प्राणीजन्य आजारांचा फास मानवाला आवळू लागल्याने पशू, पक्षांपासूनही सावध राहण्याची वेळ मानवावर आली आहे. (Animal diseases are rampant; The incidence of viral diseases is high)

दिवसेंदिवस मानवांमध्ये विविध आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यासाठी अन्नधान्य निर्मितीत होत असलेला रासायनिक घटकांचा वापर हे प्रमुख कारण सांगितले जात होते. शिवाय वाढते प्रदूषण आणि धावपळीची दिनचर्चा सुद्धा कारणीभून मानली जाऊ लागली. परंतु, आता विविध आजारांची ओळख होत लागली असून, त्यांच्या उत्पत्तीची सुद्धा उकल व्हायला लागली आहे. त्यामध्ये धोक्याची व चिंतेच बाब म्हणजे जंगली तसेच पाळीव प्राण्यांपासूनही मानवाला विषाणूजन्य, जीवाणूजन्य आजारांची बाधा होत असल्याचे निष्पण झाले असून, या संकटावर मात करण्यासाठी आटोकाट प्रयत्न वैश्‍विक स्तरावर होत आहेत.

हेही वाचा: फेरफारसाठी लाच मागणारा गायगावचा तलाठी गजाआड

‘कोविड’चे मुळ अजूनही संदिग्धच
‘कोविड-१९’चा संसर्ग वाढताच हा विषाणूजन्य आजार वटवाघूळापासून मानवाला झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, सोबतच हा मानवनिर्मित विषाणू असून, शत्रू राष्ट्राकडून त्याची पेरणी करण्यात आल्याचे बोलले जाऊ लागले. त्यामुळे अजूनही ‘कोविड-१९’ हा प्राणीजन्य आजार आहे की, मानवनिर्मित याबाबत प्रश्‍नचिन्ह कायम आहे.

हेही वाचा: पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांनी कसली कंबर

प्रमुख प्राणीजन्य आजार
अँथ्रॅक्स, ब्रुसोलोसीस, टीबी, रॅबीज, एव्हिअन इन्फ्लूएन्झा, लेप्टोस्पारोयरोसीस, निपा, इबोला, स्वाईन फिवर, बर्ड फ्यू, इकायनो कोकोसीस, क्यू फिवर, साल्मोनेला, ग्लॅन्डर हे प्राणीजन्य आजार दिवसेंदिवस वाढत आहेत.

पावसाळ्यात लेप्टोस्पारोयरोसीसचा धोका अधिक
लेप्टोस्पायरोसीस हा उंदरांपासून होणारा जीवानूजन्य आजार असून, त्याचा संसर्ग मानवामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. प्रामुख्याने पावसाळ्यात व दाट लोकवस्तीच्या ठिकाणी मानवाला लेप्टोस्पायरोसीसचा संसर्ग झाल्याच्या नोंदी आहेत.

प्राण्यांपासून मणुष्याला होणाऱ्या आजाराला प्राणीजन्य आजार म्हणतात. दिवसेंदिवस अशा प्रकारच्या आजारांचे प्रमाण वाढत असून, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी संशोधन, उपाययोजन केले जात आहे. मात्र, सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्‍यक असून, त्यासाठी प्रत्येकाने पाळीव प्राण्यांचे योग्यप्रकारे लसीकरण, डिवर्मिंग करावे. लहान मुलांना त्यांच्यापासून दूर ठेवावे. दूध, दुग्धजन्य पदार्थ, मास, अंडी योग्य पद्धतीने शिजवून, उकळून सेवन करावी. अन्नपदार्थ योग्य तापमानात साठवूण ठेवावे. आजारी जनावरांना इतर प्राण्यांपासून व मानवांपासून दूर ठेवावे. इत्यादी खबरदारी घेतल्यास प्राणीजन्य आजारांपासून बचाव होऊ शकतो.
- डॉ. नेत्रा अस्वार, मुंबई वेटरीनरी कॉलेज, रिसर्च असोसिएट

मानवापासून प्राण्यांना होणारे आजार
ज्या प्रमाणे प्राण्यांपासून मानवाला आजार होऊ शकतात त्याच प्रमाणे मानवापासून प्राण्यांना ह्यूमन टिबी, स्टापायलोकोकसचा संसर्ग होऊत ते आजारी पडू शकतात.

हेही वाचा: कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; सात नवे पॉझिटिव्हरॅबीजचे सर्वाधिक बळी
प्राणीजन्य आजारांमुळे मानवांचे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आहेत. परंतु, सर्वाधिक मृत्यू रॅबीजने होत असून, दरवर्षी हजारो लोकांचा या संसर्गाने मृत्यू होत असल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे रॅबीज या प्राणीजन्य आजारापासून बचाव करणे सर्वाधिक गरजेचे असून, त्यासाठी पाळीव कुत्रे, मांजरांचे योग्यवेळी रॅबीज लसीकरण करणे आवश्‍यक आहे. मोकाट कुत्र्यांची संख्या कमी करणे आवश्‍यक आहे. खबरदारी म्हणून मानवाला प्री-बाईट रॅबीज लसीकरण सुद्धा करून घेता येते. कुत्रा, मांजर, घोडा या प्राण्यांपासून तसेच रॅबीज झालेली गाय, म्हैस, शेळी, मेंढी चावल्यास मानवाला रॅबिज होऊ शकतो.

संपादन - विवेक मेतकर

Animal diseases are rampant; The incidence of viral diseases is high

loading image