धोका वाढतोय; आणखी एक बालक पॉझिटिव्ह

धोका वाढतोय; आणखी एक बालक पॉझिटिव्ह
धोका वाढतोय; आणखी एक बालक पॉझिटिव्ह
धोका वाढतोय; आणखी एक बालक पॉझिटिव्हesakal

पिंजर (जि.अकोला) : पिंजर (Pinjar) परिसरात दोन बालकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर बुधवारी (ता.१९) आणखी एका तीन वर्षांचा बालक पॉझिटिव्ह असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी दिली. (Another child in Akola corona positive)

कोरोनाची दुसरी लाट थांबण्याचे नाव घेत नाही. त्यात तिसऱ्या लाटेने पिंजरसारख्या भागात एन्ट्री केल्याची चर्चा आहे. पिंजर आणि पिंपळगाव चांभारे येथील प्रत्येकी एक, एक बालक पॉझिटिव्ह आला असून, आता तिसरा पॉझिटिव्ह बालक पिंजर जवळील जनुना गावात आढळला आहे.

त्यामुळे पॉझिटिव्ह बालकांची संख्या तीनवर गेली आहे. ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण आहे. पिंजर, पिंपळगाव चांभारेनंतर आता जनुना गावात तीन वर्षांचा बालक पॉझिटिव्ह निघाल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

धोका वाढतोय; आणखी एक बालक पॉझिटिव्ह
‘हॅप्पी हायपोक्सिया’ ठरतोय सायलेंट किलर!

लहान बालकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासन व प्रशासन तिसरी लाट थांबविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. बालरोग तज्ज्ञ ड्रॉक्टरांचा टास्क फोर्स स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे.

तिन्ही बालकांवर व्यवस्थित उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

धोका वाढतोय; आणखी एक बालक पॉझिटिव्ह
न्युमोनियाच्या नावाखाली कोरोना रुग्णांवर उपचार

आठवडाभरपूर्वी आढळले होते सहा बालक

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे इशारे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिले आहेत. त्यातच अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात (Akola District General Hospital) सहा बालकांना कोरोनाची लक्षणे (Symptoms of corona in children) दिसून आले होते. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना जास्त असल्याचे संकेत मिळत आहे.

काळजी घ्या

लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला, जुलाब, उलटी, चिडचिडेपणा वाढणे आदी कोरोना संसर्गाची लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे दिसून आल्यास पालकांनी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मुलांवर औषधोपचार करणे आवश्‍यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

संपादन - विवेक मेतकर

Another child in Akola corona positive

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com