esakal | खरीप पीक विमाकरिता करा अर्ज; कर्जदार, बिगर कर्जदारांनाही संधी
sakal

बोलून बातमी शोधा

खरीप पीक विमाकरिता करा अर्ज; कर्जदार, बिगर कर्जदारांनाही संधी

खरीप पीक विमाकरिता करा अर्ज; कर्जदार, बिगर कर्जदारांनाही संधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : अकोला जिल्ह्याकरीता खरीप हंगामातील उडीद, ज्वारी, सोयाबीन, मूग, तूर, कापूस या पिकांचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत समावेश करण्यात आला आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही योजनेमध्ये सहभागी होता येणार असून, या योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळवण्‍याची शेतकऱ्यांना १५ जुलै २०२१ पूर्वी प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. (Apply for kharif crop insurance; Opportunity for borrowers, even non-borrowers)

हेही वाचा: ॲड. प्रकाश आंबेडकर तीन महिन्यांच्या सुटीवर

महाराष्ट्र सरकारने प्रधानमंत्री फसल बिमा योजना (पीएमएफबीवाय) अंमलात आणण्याचे अधिकार एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीला प्रदान केले आहेत. पीएमएफबीवाय योजना दुष्काळ, पूर, कोरडे गवत, भूस्खलन, चक्रीवादळ, कीटक, रोग आणि इतर यांसारख्या व्‍यापक धोक्‍यांमुळे पीक उत्‍पादनामध्‍ये होणाऱ्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना विमा पुरवते. उत्‍पादनामध्‍ये झालेल्‍या नुकसानाची तपासणी करण्‍याच्‍या उद्देशाने राज्‍य सरकार योजनेसाठी अधिसूचित करण्‍यात आलेल्‍या भागांमधील अधिसूचित पिकांवर क्रॉप कटिंग एक्‍स्‍परिमेण्‍ट्सचे (सीसीई) नियोजन व आयोजन करेल.

हेही वाचा: विद्यार्थ्यांची क्षमता सेतू कोर्समधून तपासणार

करण्‍यात आलेल्‍या सीसीईंमधून उत्‍पादन कमी असल्‍याचे आढळून आल्‍यास शेतकऱ्यांचे उत्‍पादन कमी झाल्‍याचे मानण्‍यात येईल. ज्‍यासाठी शेतकऱ्यांना क्‍लेम्‍स देण्‍यात येतील. ही योजना लागवडपूर्व, लागवडीदरम्‍यान व लागवडीनंतर, अशा पीक चक्राच्‍या सर्व टप्‍प्‍यांदरम्‍यान होणाऱ्या नुकसानांसाठी विमा संरक्षण देते. पीएमएफबीवाय योजनेअंतर्गत सर्व नुकसानांना कृषी विभागाची मान्‍यता आहे. अकोला, पालघर, रायगड, धुळे, पुणे, औरंगाबाद, हिंगोली आणि भंडारा या जिल्‍ह्यांमधील शेतकरी वर अधिसूचित केलेल्‍या पिकांसाठी पीएमएफबीवाय योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळवण्‍यासाठी त्‍यांच्‍या जिल्‍ह्यांमधील संबंधित बँका, कॉमन सर्विस सेंटर्स (सीएससी) यांच्‍याकडे जाऊ शकतात किंवा अधिकृत एजंट्सशी संपर्क साधू शकतात. विमा संरक्षण मिळवण्‍यासाठी वैधता कालावधीची सविस्‍तर माहिती शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्‍या वेबसाइटवर उपलब्‍ध असेल.

हेही वाचा: पाच लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ, पती व सासू विरुद्ध गुन्हा

योजनेंतर्गत जिल्हानिहाय अधिसूचित करण्यात आलेली पिके
महाराष्‍ट्र सरकारने या योजनेअंतर्गत अधिसूचित केलेल्‍या पिकांसाठी जिल्‍ह्यांमध्‍ये योजनेची अंमलबजावणी करण्‍यात येईल. त्यामध्ये पालघर जिल्ह्यासाठी भात, नाचणी, उडीद, रायगड जिल्ह्यासाठी भात, नाचणी, धुळे जिल्ह्यासाठी भात, उडीद, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, तीळ, मूग, तूर, कापूस, मका, कांदा, पुणे जिल्ह्यासाठी भात, उडीद, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, तूर, कांदा, औरंगाबाद जिल्ह्यासाठी उडीद, ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, मूग, तूर, कापूस, मका, कांदा, हिंगोली जिल्ह्यासाठी उडीद, ज्वारी, सोयाबीन, मूग, तूर, कापूस, अकोला जिल्ह्यासाठी उडीद, ज्वारी, सोयाबीन, मूग, तूर, कापूस, भंडारा जिल्ह्यात भात, सोयाबीन पिकांना अधिसूचित करण्यात आले असून, योजनेंतर्गत विमा संरक्षण मिळवण्‍याची अंतिम मुदत १५ जुलै २०२१ निर्धारित करण्यात आली आहे.

संपादन - विवेक मेतकर

Apply for kharif crop insurance; Opportunity for borrowers, even non-borrowers

loading image