esakal | कोरोना चाचणीसाठी वाडेगाव ग्रामस्थांना करावे लागले उपाेषण
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना चाचणीसाठी वाडेगाव ग्रामस्थांना करावे लागले उपाेषण

कोरोना चाचणीसाठी वाडेगाव ग्रामस्थांना करावे लागले उपाेषण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः बाळापूर तालुक्यातील वाडेगावात राहणाऱ्यांची काेराेना चाचणी (Corona Test) करुन पाॅझिटिव्ह आढळून येणाऱ्यांवर रुग्णालयात उपचार करण्यात यावे, या मागणीसाठी एका ग्रामस्थाने जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर (Collector Office Akola) उपाेषण सुरू केले. (At Wadegaon in Akola, the villagers had to undergo fasting for corona test)

जवळपास ४० हजार लाेकसंख्या असलेल्या वाडेगाव येथील अरूण यादवराव देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानुसार सध्या टाळेबंदीमुळे व्यवहार ठप्प झाले असून, गरीबांच्या उदनिर्वाहाचा प्रश्न निर्माण जाला आहे.

हेही वाचा: कोरोना निर्बंधांचा भंग करणाऱ्या ४० ऑटोचालकांवर गुन्हे दाखल

काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी हे करण्यात आले असले तरी काेराेना बाधितांचा मात्र मुक्तसंचार सुरु आहे. या प्रशासन व आराेग्य विभाग जबाबदार असल्याचा आराेप उपाेषकर्त्या देशमुख यांनी केला आहे. उपोषणाकर्त्याची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले, जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांनी भेट घेवून त्यास उपोषण मागे घेण्यास सांगितले.

संपादन - विवेक मेतकर

At Wadegaon in Akola, the villagers had to undergo fasting for corona test