शहरातील दीडशे वर्षे जुना रेल्वे मालधक्का 1 ऑगस्टपासून  होणार बंद, भुसावळ रेल्वे विभागाने काढला आदेश

मनोज भिवगडे 
Thursday, 23 July 2020

शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी अकोला रेल्वे स्थानकावरील दीडशे वर्षे जुना मालधक्का 1 ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मालधक्‍क्‍याचे काम बोरगाव मंजू येथून करण्याचसंदर्भातील अधिसूचना मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे मंडळातर्फे यासंदर्भात जारी करण्यात आली आहे.

अकोला  ः शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी अकोला रेल्वे स्थानकावरील दीडशे वर्षे जुना मालधक्का 1 ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मालधक्‍क्‍याचे काम बोरगाव मंजू येथून करण्याचसंदर्भातील अधिसूचना मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे मंडळातर्फे यासंदर्भात जारी करण्यात आली आहे.

एमआयडीसी क्षेत्रातील अनेक उद्योजकांची व ट्रान्सपोर्ट यांची मागणी लक्षात रेल्वे विभागाच्या भुसावल डिव्हिजनने 1ऑगस्टपासून सर्व सुविधायुक्त मालधक्का बोरगाव मंजू येथे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

अकोल्यात रेल्वे कोच फॅक्‍टरीसाठी 100 कोटीचा प्रस्ताव

अकोला शहराची वाढती लोकसंख्या, वाहतुकीची समस्या व व्यापाऱ्यांना होणारी अडचण, वेळेचे बंधन व प्रदूषण याचा सर्वांगिण विचार करीत मालधक्का स्थलांतरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी या संदर्भात नुकतीच रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. अकोला शहराच्या रेल्वे स्टेशनवर अद्यावत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मालधक्का स्थलांतरीत करणे आवश्‍यक होते. अकोला-अकोट रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाले आहे.

अकोला- खंडवा गेज परिवर्तनाला गती, अकोला रेल्वे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंग पूर्ण

या रेल्वे मार्गाची चाचणीही घेवून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. असा परिस्थितीत अकोला रेल्वे स्थानकावरील वरदळ आणखी वाढणार आहे. ते बघता मालधक्का स्थलांतरण आवश्‍यक होते. त्यादृष्टीने अनेक वर्षांपासून काम सुरू होते. अखेर 1 ऑगस्टपासून मालधक्का स्थलांतरणावर रेल्वे विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhusawal Railway Department orders closure of 150-year-old railway freight in Akola from August 1