esakal | सेवेत कायम करण्यासाठी कंत्राटी कर्मचार्‍यांचे धरणे ; जिल्हाधिकार्‍यांना दिले मागण्यांचे निवेदन
sakal

बोलून बातमी शोधा

सेवेत कायम करण्यासाठी कंत्राटी कर्मचार्‍यांचे धरणे ; जिल्हाधिकार्‍यांना दिले मागण्यांचे निवेदन

कोरोना जागतिक महामारीत भारतात विशेषतः महाराष्ट्रात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना त्यामुळे प्रशासनासह आरोग्य विभागावर सुद्धा प्रचंड प्रमाणात ताण वाढला होता.

सेवेत कायम करण्यासाठी कंत्राटी कर्मचार्‍यांचे धरणे ; जिल्हाधिकार्‍यांना दिले मागण्यांचे निवेदन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : सर्वत्र कोरोनाचे भय असताना या काळातही कोविड-19 अंतर्गत काम करणार्‍या कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांना कायम सेवेत घेण्यात यावे, यासाठी कंत्राटी कर्मचार्‍यांनी 18 डिसेंबरला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली.

हे ही वाचा : करडी परिसरातील शेतकरी सेंद्रिय शेतीकडे ; तीस गुंठ्यामध्ये 10 विविध वाणाचा प्रयोग

कोरोना जागतिक महामारीत भारतात विशेषतः महाराष्ट्रात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना त्यामुळे प्रशासनासह आरोग्य विभागावर सुद्धा प्रचंड प्रमाणात ताण वाढला होता. अशा कठीण काळात कर्तव्य बजावणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना सेवा संपुष्टात येत असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वांना आरोग्य विभागातील रिक्तपदी नेमणूक करून कायमस्वरूपी किंवा एनआरएचएम अंतर्गत रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. तसेच येणार्‍या काळात कोरोना लसीकरण करण्यासाठी प्रशिक्षण देऊन कामाची संधी द्यावी, या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. तसेच जोपर्यंत आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांच्या जागा निघत नाही, तोपर्यंत यातील सर्व कर्मचारी यांचे शिक्षणाच्या आधारे रिक्त असणार्‍या पदावर 100 टक्के समायोजन करून घ्यावे यासह विविध मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत.

हे ही वाचा : मातृतीर्थच्या सुपुत्राला अखेरचा निरोप ; शहीद जवान प्रदीप मांदळे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

यावेळी शेख जहीर, शेख शब्बीर, पायल मोरे, किरण भांदुर्गे, स्नेहा मोरे, पूजा मुळेकर, पल्लवी जाधव, प्रतीक्षा मोरे, अंजली चोपडे, स्वाती राठोड, निकिता वानखेडे, अनिता खरे, सतीश गवळी, मयूर अंभोरे, प्रकाश डोंगरे, अक्षय गवळी, शेख वसीम, गोपाल सुरोशे, विजय मोरे, अशोक मुंडे, बुद्धभूषण सरकटे, भूषण रावे, अमोलकुमार गवई, दयानंद गवई, प्रशांत ठेंग, ऋषीकेश देशमुख,नरसिंग जायभाय आदींची उपस्थिती होती.

संपादन - सुस्मिता वडतिले