बुलढाणा : भावसार कलेक्शन लुटणाऱ्या दरोडेखोरांचा लागला छडा; तिघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

बुलढाणा : भावसार कलेक्शन लुटणाऱ्या दरोडेखोरांचा लागला छडा; तिघांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देऊळगाव राजा (जि. बुलढाणा) : शहरातील भावसार कलेक्शन कापड दुकानवर 3 नोव्हेंबर रोजी अज्ञात दरोडेखोरांनी दुकान मालक व त्यांच्या मुलास गुप्ती चा धाक दाखवून सुमारे चार लाख रुपय पळवून नेल्याची खळबळजनक घटना घडली होती सदर घटनेतील तिघे दरोडेखोरांना बुधवारी मध्यरात्री जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले पोलिसांच्या या कामगिरीबद्दल नागरिकांमध्ये पोलिसांविषयीचा विश्वास वाढला आहे.

शहरातील मुख्य रस्त्यावरील भावसार कलेक्शन या कापड दुकानात अज्ञात दोघांनी तोंडाला पूर्णपणे रुमाल बांधून प्रवेश केला व गुप्ती चा धाक दाखवून सुमारे चार लाख रुपये लुटून नेले होते ऐन दिवाळी सणाच्या गर्दीत घडलेल्या दरोड्याच्या घटनेमुळे एकीकडे व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली तर सशस्त्र दरोड्याचा तपास हा पोलिसांसाठी एक प्रकारे मोठे आवाहन ठरले होते.

या आवाहनाला स्वीकारून जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया,अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोड, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जयवंत सातव, सहाय्यक पोलीस निरीक्षक डीएम वाघमारे यांनी दोन पथक निर्माण करून तपासकामी लावले दरोडेखोरांनी चेहरा पूर्णपणे रुमालाने बांधून घेतल्याने ओळख पटविणे सोपे नव्हते.

अशा परिस्थितीत दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहणी करण्यात आली आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी क्रमांक स्पष्ट दिसत नसल्याने दुचाकी क्रमांक तपासण्यासाठी विविध आठ क्रमांकाच्या मोटर सायकल विषयी तपास करण्यात आला यातच १६ नोव्हेंबर रोजी चिखली येथे सशस्त्र दरोडा टाकून दोघा दरोडेखोरांनी दुकान मालकाचा खून केल्याची घटना घडली. आणि येथूनच दरोडेखोरां विषयी धागेदोरे सापडले पोलिसांनी या दिशेने तपासाची चक्रे फिरविली चिखली येथील घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.

हेही वाचा: परमबीर सिंग महाराष्ट्रात दाखल; सरकार करणार कारवाई

दोन्ही गुन्ह्यात साम्य असल्याने पोलिसांचा संशय बळावला सदर गुन्ह्याच्या तपासात वर नमूद आठ मोटरसायकल च्या क्रमांक पैकी एकावर फोकस करून पोलिसांनी एम एच 28 संदर्भात बुलढाणा आरटीओ एम एच 21 संदर्भात जालना आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधून तब्बल 70 मोटर सायकलची पडताळणी करण्यात आली व शेवटी एम एच 28 बीडी 6430 क्रमांकाच्या दुचाकीचा ताबा असलेल्या राहुल जायभाय याच्याबाबत माहिती काढली असता धक्कादायक बाब समोर आली.

राहुल जायभाय नावाचा व्यक्ती हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याबाबत व त्याच्यावर जालना व औरंगाबाद जिल्ह्यात खुनासह गंभीर गुन्हे दाखल असल्याने सीसीटीव्ही फुटेज पडताळण्यात आल्यानंतर दरोड्यात सहभागी व्यक्ती हा राहुल किसन जायभाय असल्याची खात्री पटली यानंतर नियोजन बद्ध सापळा रचून 25 नोव्हेंबर रोजी देऊळगाव राजा व चिखली पोलीस पथकाच्या संयुक्त कारवाईत रात्री अडीच वाजता सदर आरोपीस ताब्यात घेऊन विचारपूस केली असता देऊळगाव राजा व चिखली येथील गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला दरम्यान राहुल यास पोलिसी खाका दाखविताच तपासाअंती राहुल अशोक बनसोड व नामदेव पंढरीनाथ बोगाणे दोन्ही राहणार धोत्रा नंदाई तालुका देऊळगाव राजा यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

हेही वाचा: Vidhan Parishad Election : 415 मतदारांची अंतिम यादी प्रसिध्द

दोन्ही घटनेतील साम्य

देऊळगाव राजा ते चिखली येथील दोन्ही दरोड्याच्या घटनेत शस्त्राचा धाक दाखवून लुटण्यात आले व दरोडा टाकण्याची वेळ जवळपास सारखी होती याचबरोबर दोन्ही गुन्ह्यातील सीसीटीवी फुटेज मधील हालचालीवरून या दोन्ही गुन्ह्यात सहभागी आरोपी एकच असल्याचे सिद्ध झाले आणि गुन्ह्याचा तपास लागला

पोलीस प्रशासनावर अभिनंदनाचा वर्षाव

दरोडेखोरां चा छडा लावण्यात ठाणेदार जयवंत सातव एपीआय डीएम वाघमारे पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे सहाय्यक फौजदार अकील काझी पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री कुठे श्री मोरे श्री कायंदे श्री जोरवर यांनी सहभाग घेतला पोलीसांच्या या यशस्वी कारवाईबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून भाविकांमध्ये पोलिसांबाबत विश्वास वाढला आहे.

loading image
go to top