ऋषिपंचमी : भाविकांनी टेकविला श्रींच्या मुख्यप्रवेशद्वारावर माथा

सतत लॉकडाऊन कडक निर्बंधामुळे उत्सवावर विरजण पडले आहे.
shegaon
shegaonsakal

शेगाव (जि. बुलडाणा) : येथील श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने दरवर्षी ऋषिपंचमी प्रगटदिन आषाढी एकादशी रामनवमी हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येत होते मात्र मागील दोन वर्षापासून कोरोना आजाराने राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात हाहाकार माजविला आहे. सतत लॉकडाऊन कडक निर्बंधामुळे उत्सवावर विरजण पडले आहे. आज ११ सप्टेंबर रोजी श्री संत गजानन महाराज संस्थानचे वतीने साजरा करण्यात येणारा १११ वा ऋषिपंचमी सोहळा अत्यंत साधेपणाने व लॉकडाऊनचे नियमांचे पालन करून मोजक्याच मान्यवराचे उपस्थितीत संपन्न झाला.

संस्थानच्या वतीने साजरा करण्यात येणारा कोणताही उत्सव म्हटले की उत्सवाला हजेरी लावण्यासाठी महारास्ट्रभरातून लाखोंच्या संखेने भाविक तसेच दिंड्या दोन दिवसाआधी शहरात दाखल होत असत टाळ मृदंग पांढरा गणवेशधारी सेवेकरी मृदंगाचा गजर अन गण गण गणात बोतेचा मंत्र शेगावात घुमत असे एक वेगळेच धार्मिक व आध्यात्मिक वातावरण शहराला प्राप्त होत असे प्रत्तेक उत्सवा दरम्यान हत्ती अश्व मेणासह टाळकरी वारकरी यांच्यासह शहरात काढण्यात येणारी श्रींच्या रजत मुखवटयाची परिक्रमा भक्तिमय वातावरण निर्माण करीत असे शहरात येणाऱ्या लाखो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यासाठी संस्थानचे वतीने पुरेपुर व्यवस्था करण्यात येत होती.

shegaon
डॉ. दिलीप मालखेडेंची अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

शेगावातील अनेक सामाजिक संस्थासुद्धा चहा फराळ महाप्रसादाचे वाटप करून भक्तांची सेवा करण्यात गुंतलेले असत पोलीस प्रशासन संस्थानचे सेवेकरी यादरम्यान सुरक्षेच्या दृष्टिने चोख बंदोबस्त बजावत असत परंतु कोरोनामुळे लावण्यात आलेल्या कड़क निर्बंधामुळे शहरात भविकांचा हिरमोड झाला आहे प्रचंड गर्दीने नेहमी फूललेला गांधीचौक ते मंदिर या मार्गावर दोन वर्षापासून हे भयान दृष्य जनतेला बघावे लागत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामूहिक कार्यक्रमा बंधी व कड़क निर्बंध पाडण्याचे आदेश दिल्याने यंदाचा ऋषिपंचमी उत्सव छोटेखानी स्वरुपात संपन्न झाला आहे.

महाराष्ट्रभरातील मंदिर उघडन्यासाठी अनेक राजकीय व धार्मिक संस्थानी विविध आंदोलन केली असली तरी कोरोनाची तीसरी लाट ओसरे पर्यंत वाट पाहन्याशिवाय कुठलाच पर्याय नाही मंदिर आनंद सागर प्रकल्प बंद असल्याने अनेकांचे रोजगार बुडाले आहेत शहरात इतर उधोग धंदे नसल्याने बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील वाढत्या गर्दीमुळे काही नागरिकांनी उत्पनाचे साधन म्हणून घराला गेष्ट हाउस केले होते मात्र आता कोरोना आजाराने गर्दीच ओसरल्याने गेष्ट हाउसचे पुन्हा घरात रूपांतरण झाले आहे श्रीचे मंदिर केव्हा उघडनार याची प्रतीक्षा भविकांना लागली आहे. आज नाहीतर उद्या सगळ काही सुरळीत होईल या आशेवर प्रत्येक जन जगत आहे मंदिरे सुरु व्हावे हीच सर्वांची श्रीच्या चरणी प्रार्थना करीत आहे.

shegaon
शिक्षण सभापतींचे अध्यक्षांना आव्हान! वाद चव्हाट्यावर

शिवशंकरभाऊ पाटील यांच्या अनुपस्थितीत पहिला सोहळा

श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनानंतर तब्बल ६० वर्षानंतर प्रथमच श्री गजानन महाराज पुण्यतिथीचा पहिला सोहळा आहे. त्यामुळे ऋषीपंचमीदिनी स्व.शिवशंकरभाऊ पाटील यांची आठवण भक्तांना आल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र तथा श्री गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील यांच्या मार्गदर्शनात देवस्थानचा कारभार सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com