अरे हे काय? कलकत्ता ढाब्यावर चक्क दारूची पार्टी;  राष्ट्रीय महामार्गावरील प्रकार वाचा

सुगत खाडे  
Monday, 27 July 2020

राष्ट्रीय महामार्गावरील प्रसिद्ध कलकत्ता ढाब्यावर रंगलेल्या दारूच्या पार्टीवर रविवारी (ता. 26) उशीरा रात्री पोलिसांनी छापा टाकून 35 जणांना अटक केली. आरोपींकडून लाखोंच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

अकोला  ः राष्ट्रीय महामार्गावरील प्रसिद्ध कलकत्ता ढाब्यावर रंगलेल्या दारूच्या पार्टीवर रविवारी (ता. 26) उशीरा रात्री पोलिसांनी छापा टाकून 35 जणांना अटक केली. आरोपींकडून लाखोंच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कलकत्ता ढाब्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने रविवारी (ता. 26) रात्री छापा टाकला. या ढाब्यावर दारूच्या पार्ट्या रंगतात, अशी माहिती विशेष पथकाला होतीच. दरम्यान रविवारी (ता. 26) रात्री उशीरा कलकत्ता ढाब्यावर छापेमारी केली.

या छापेमारीत दारूचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला. तसेच या दारूची विक्री करणाऱ्यांना 35 जणांना अटक करण्यात आली.

आरोपींमध्ये जगदीप जसवंतसिंह ढालीवाल (वय 31 वर्षे रा. कलकत्ता ढाबा), संतोष श्रीराम नागरे (वय 33 वर्षे, रा.भारती प्लॉट बाळापूर नाका), उमेश नागोराव अंधारे (वय 39 वर्षे, रा.भिरड वाडी बाळापूर रोड), राहूल विजय जांगडे (वय 36 वर्षे, रा.जुने शहर हरीहर पेठ), कमलेश मधूकरराव भरणे (वय 35 वर्षे, रा.शिव नगर जुने शहर), स्वप्नील रामदास इंगळे (वय 30 वर्षे, रा.कनाल रोड बाळापूर नाका), संदिप सुनील वानखडे (वय 37 वर्षे रा. शिव नगर बाळापूर नाका), ललील दत्तात्रय झारकर (वय 37 वर्षे, रा. भारती प्लॉट बाळापूर नाका),

आशीष प्रकाश सोसे (वय 35 वर्षे रा. भारती प्लॉट जुने शहर), सूरज डीगांबर राजुरकर (वय 20 वर्षे रा. खरप रोड दमाणी हॉस्पीटल), सुरज शंकर कराळे (वय 34 वर्षे, रा. पारस वियूत कॉलनी, ता. बाळापूर), जितेंद्र रमेश जांगळे (वय 38 वर्षे रा. हरीहर पेठ), राहुल अशोक बुंदेले (वय 24 वर्षे रा. शिवनगर पाण्याच्या टाकीजवळ), गणेश केशवराव अटाळे (वय 30 वर्षे रा. शिवनगर), सचिन ज्ञानेश्वर गोतमारे (वय 31 वर्षे रा.शिवनगर), मोहमंद शाहरूख मोहंमद फारूख (वय 26 वर्षे रा.हमजा प्लॉट), आशुतोष प्रफुल बोदडे (वय 19 वर्षे रा.सहकार नगर गौरक्षण रोड),

शुभम श्रीराम काटकर (वय 20 वर्षे रा.वानखडे नगर), शेख शहजाद शेख नसीरोद्दीन (वय 22 वर्षे रा पातूर), अब्दूल कलीम अब्दूल मुतलीब (वय 35 वर्षे, रा. गंगानगर वाशीम बायपास), गोपाल रमेश ढगे (वय 26 वर्षे रा. रिधोरा), गजानन देवीदास उईके (वय 35 वर्षे, रा. भारती प्लॉट शिवनगर), गणेश उत्तमराव भोगरे (वय 55 वर्षे रा. भारती प्लॉट), आशीष जनार्दन मोहोकार (33 वर्षे रा.दिवेकर पोस्ट ऑफीसजवळ, जठारपेठ), मोहंमद शकील मोहंमद नजीर (वय 34 वर्षे रा.बैधपूरा),

विशाल दिनकर सोळंके (वय 30 वर्षे रा.रिधोरा), शैलेश सिताराम बाणीय (वय 34 वर्षे रा.माळीपूरा चौक), पियुष राजेश पोपट (वय 31 वर्षे रा.माणेक टॉकीज जवळ), रवी परशराम लखवानी (38 वर्षे रा.सिंधी कॅम्प), प्रतीक कैलाश रत्नपारखी (वय 23 वर्षे रा.डाबकी रोड), राजेश दामोधर तळोणे (वय 40 वर्षे रा.डाबकी रोड फडके नगर), सुभाष जोखनलाल विश्वकर्मा (वय 34 वर्षे रा.विठठल नगर मोठी उमरी),

पंकज रामचंद्र विश्वकर्मा (वय 29 वर्षे रा. विठठल नगर मोठी उमरी), सैयद रियाजोद्दीन सैयद नसिरोरोदिन (वय 32 वर्षे रा.सोळाशे प्लॉट इंदिरा नगर), मोहीमोदीन कमोरोद्दीन (वय 18 वर्ष, डाबकी रोड फळके नगर) यांचा समावेश आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chucky liquor party at Calcutta Dhaba in Akola; Read National Highway Types