नवा पेच; कोविड रुग्णालयांच्या डॉक्टरांचे सामुहिक राजीनामे

नवा पेच; कोविड रुग्णालयांच्या डॉक्टरांचे सामुहिक राजीनामे
Doctor
DoctorSakal

अकोला: कोरोना (Corona) बाधीत रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या आणि शासकीय रुग्णालयात (Government Hospital) असलेल्या अपुऱ्या सुविधा पाहता खासगी रुग्णालयांचा अनेक रुग्णांना (Private hospital) आधार तर मिळालाच तर काहींचे प्राणही वाचले आहेत. दुसरीकडे शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर प्राथमिक उपचार होत आहेत. पण, व्हेंटिलेटरची (Ventilator) गरज असलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयाशिवाय पर्याय नाही. शहरातील बहुतांश डॉक्टरांनी (Doctors) आपल्या रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करून २४ तास सेवा देण्यात येत आहे. त्यामुळे या रुग्णालयांमधील मृत्युदर कमी असल्याचे सांगण्यात येते. ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवड्यावरही परिश्रमपूर्वक मात करण्यात येत आहे. मात्र समाजातून या डॉक्टरांचेच खच्चीकरण होत असून त्यांच्यावर गंभीर आरोप करून डॉक्टरांना मानसिक त्रास दिला जात असल्याची ओरड आहे . विशेष म्हणजे हे सर्व राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यातील चिखली येथे घडत आहे. Collective resignation of doctors of Covid Hospital

Doctor
पॉझिटिव्ह रुग्ण २४ तासात झाला निगेटिव्ह!

राजकीय हस्तक्षेपाची शक्यता

सद्या स्थानिक राजकीय हस्तक्षेप यात वाढल्याने खासगी आरोग्य यंत्रणाच शहरात तणावाखाली आली आहे. त्याच्या परिणामस्वरूप या खासगी कोविड रुग्णालयचालक डॉक्टरांनी टोकाचे पाऊल उचलत पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडेच राजीनामे सादर केले आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व तहसीलदारांनाही याबाबत त्यांनी कळविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Doctor
आरोग्य यंत्रणा हादरली; ‘म्युकर मासोसीस’मुळे महिलेचा झाला मृत्यू

डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या भूमिकेकडे लक्ष

अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आता यावर कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागलेले आहे. प्रामुख्याने सेवाकार्यात सततच्या होत असलेला स्थानिक राजकीय हस्तक्षेपासह अन्य काही बाबींचा उल्लेख सामूहिक राजीनाम्यात करण्यात आला आहे. त्यामुळे या कोराेनाच्या आपत्ती काळात आता पालकमंत्री डॉ. शिंगणे हे प्रकरण कसे हाताळतात याकडे सध्या लक्ष लागून आहे.

Doctor
कोरोनाचा धोका; १४ दिवसांत दीडशेवर बळी!

आरोग्य यंत्रणा प्रभावित

चिखली येथील श्री योगिराज हॉस्पिटल, सावजी, खंडागळे, दळवी, गुरुकृपा, गंगाई, तुळजाई, तायडे जयस्वाल हॉस्पिटलसह अन्य एका रुग्णालयातील डॉक्टरांनी हे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे चिखलीतील आरोग्य यंत्रणा प्रभावित होणार आहे.

Collective resignation of doctors of Covid Hospital

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com