
तेल्हारा येथील खरेदी विक्री संघात मागील वर्षी खरेदीमध्ये अनियमता झाली होती. त्यामुळे शासनाने खरेदी विक्री संस्थेला काळ्या यादीत टाकण्याचा आदेश जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना दिला होता.
तेल्हारा (अकोला) : शासन निर्णयानुसार आधारभूत योजने अंतर्गत सन २०२०-२१ या खरीप हंगामात तेल्हारा येथे नाफेडने मका, ज्वारी खरेदी सुरू केली नाही. याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्याची दखल घेत बाळापूर येथील स्व. वसंत रावजी दादंळे खासगी कृषी बाजार पारस या संस्थेला तेल्हारा येथे मका, ज्वारी खरेदी सुरू करण्याचा आदेश दिला आहे.
हे ही वाचा : अकोला : कृषी कायद्याच्या विरोधात किसान विकास मंच दिल्लीला जाणार
तेल्हारा येथील खरेदी विक्री संघात मागील वर्षी खरेदीमध्ये अनियमता झाली होती. त्यामुळे शासनाने खरेदी विक्री संस्थेला काळ्या यादीत टाकण्याचा आदेश जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना दिला होता. त्यानंतर तेल्हारा येथे मका, ज्वारी खरेदी सुरु करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली होती. ‘सकाळ’ने ही खरेदी रखल्याबाबतचे वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी तेल्हारा येथे मका, ज्वारी खरेदी सुरू करण्याचा आदेश काढला आहे. त्यानुसार बाळापूर येथील स्व. वसंत रावजी दादंळे खासगी कृषी बाजार पारस ही संस्था आता तेल्हारा येथील शेतकऱ्यांचा मका, ज्वारी खरेदी करणार आहे.
हे ही वाचा : उमेदवारांना द्यावे लागेल हमीपत्र ; आरक्षित जागेवरून निवडणूक लढणाऱ्यांसाठी सूचना
हरभरा, तूर खरेदीचे काय?
पारस येथील संस्थेला केवळ मका, ज्वारी खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिला आहे. मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हरभरा, तूर पेरणी केली आहे. त्यामुळे हरभरा-तूर खरेदीचे काय, असा प्रश्न तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. हरभरा, तूर खरेदीही येथे सुरू करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
तेल्हारा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यास आम्ही शेतकऱ्यांचा माल खरेदी करू.
- संतोष दादंळे, संचालक स्व. वसंत रावजी दादंळे खासगी कृषी बाजार पारस.मी ज्वारीची नोंद करण्यासाठी तेल्हारा खरेदी विक्री संस्थेत गेलो असता मला नोंद कुठे करावी, याची माहिती दिली नाही.
- विजय खोटरे, शेतकरी सिरसोली.
संपादन - सुस्मिता वडतिले